आपला जिल्हा

शुक्रवारी राजहंस दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा

शुक्रवारी राजहंस दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा
मार्केट कमिटी व शेतकी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १० सप्टेंबर २०२५- काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरलेल्या अमृत उद्योग समूहातील संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ,शेतकी संघ व संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती यांची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी होणार असल्याची माहिती चेअरमन रणजीतसिंह देशमुख, शंकरराव खेमनर आणि संपतराव डोंगरे यांनी दिली आहे.

जाहिरात
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर संगमनेरच्या सहकाराची वाटचाल सुरू आहे. राज्यामध्ये अनेक शेतकी सहकारी संघ मोडकळीस आले असताना संगमनेरचा शेतकी संघ हा आदर्शवत ठरणार आहे. तसेच ग्रामीण भागात दूध व्यवसायातून क्रांती करणाऱ्या राजहंस दूध संघाने संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध केले आहे. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या सुविधा देत असून ही बाजार समिती राज्यात अग्रगण्य ठरली आहे.

जाहिरात

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावरील अमृतेश्वर मंदिरासमोरील प्रांगणात शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात व मा. आ.डॉ सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता संपतराव डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर शेतकी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे तर सकाळी 10 वाजता सभापती शंकर पाटील खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.

जाहिरात

तसेच सकाळी 11 वाजता रणजीतसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुका दूध उत्पादक सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.

यावेळी आमदार सत्यजित तांबे, ॲड माधवराव कानवडे, बाजीराव पाटील खेमनर, सौ दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे,रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, राजेंद्र कडलग, राजेंद्र गुंजाळ, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन दूध संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, शेतकी संघाचे व्हाईस चेअरमन सुनील कडलग व मार्केट कमिटीचे उपसभापती गीताराम गायकवाड व सर्व संचालक मंडळांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे