आपला जिल्हा

आमदार गोपीचंद पडळकर यांचा कोपरगावात चपला मारत निषेध

आमदार गोपीचंद पडळकर यांचा कोपरगावात चपला मारत निषेध
आमदार पाटील यांच्या संबंधी केले बेताल वक्तव्य
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २० सप्टेंबर २०२५-  ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात नीच व खालच्या दर्जाचे वक्तव्य करणारे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा कोपरगाव  शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेश प्रवक्ते ॲड. संदीप वर्पे यांच्या नेतृत्वाखाली निषेध व्यक्त करत तहसीलदार यांना शनिवार दि २० सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले.

जाहिरात

याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते ॲड. संदीप वर्पे, तालुका अध्यक्ष बापू रांधवणे, कार्याध्यक्ष तानाजी जाधव, ॲड. दिलीप लासुरे, सुरेश असणे, ॲड. रमेश गव्हाणे, गौतम बनसोडे, सुनील वर्पे, दिनेश वर्पे, निखिल थोरात, स्वप्नील पवार,रिंकू मगर, माजिद पठाण, शुभम शिंदे, विजय खोमणे, श्याम जावळे, ओंकार वढणे,ॲड. ऋषिकेश पोकळे, ऋतुराज काळे, गणेश शिंदे,किशोर वाकचौरे, नंदकिशोर जाधव, किशोर जाधव आदींनी निषेध व्यक्त करत निवेदन दिले.

जाहिरात
 याप्रसंगी ॲड. वर्पे यांनी बोलताना सांगितले की, गोपीनाथ गोपीचंद पडळकर सारख्या व्यक्तीमध्ये जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भवितव्य दिसत असेल तर हे  त्यांचा सुसंस्कृतपणाबद्दल नक्कीच शंका उपस्थित करण्यासारखे आहे तर २०१४ पासून आपल्या राज्यात पडळकर,राणे, राणा सदावर्ते, कंबोज, वाघ अशा अनेक लोकांना राजश्रय व पाठबळ देऊन विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खालच्या पातळीत टीका करवली जात आहे याचा राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायबंद घालावा आणि यापुढे जर विरोधी पक्षाच्या नेत्याबद्दल असे अपशब्द कोणी वापरले तर त्यांच्याविरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत उपस्थित सर्वांनी आमदार पडळकर यांच्या फोटोला चपला मारत जाहीर निषेध केला.
कोपरगाव तालुक्यातील जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे साठी जलसंपदा मंत्री असताना भरीव तरतूद जयंत पाटलांनी केली त्यामुळे निळवंडेची कामे पूर्णत्वास गेली तर
कोपरगाव तालुक्यातील ब्रिटशकालीन गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांच्या अस्तरीकरणासाठी निधी जयंत पाटलांनी दिला.
जयंत पाटील राज्य पातळीवर योगदान देणारे नेते तर
गोपीचंद पडळकरच योगदान काय ? –
ॲड संदीप वर्पे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे