जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत कार्तिक पगारेचा तृतीय क्रमांक
जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत कार्तिक पगारेचा तृतीय क्रमांक
जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत कार्तिक पगारेचा तृतीय क्रमांक

कोपरगाव विजय कापसे दि २३ सप्टेंबर २०२५: जामखेड तालुका मल्लखांब असोसिएशन आयोजित शालेय जिल्हास्तरीय १४, वर्षे वयोगट मुले मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धा शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी जामखेड येथील श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ, योग व मल्लखांब प्रशिक्षण संस्था येथे उत्साहात संपन्न झाल्या.
या स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, कोपरगाव येथील विद्यार्थी कार्तिक विजय पगारे याने मल्लखांब प्रकारात ५.२५ गुण व रोप मल्लखांब प्रकारात ५.४५ गुण मिळवून एकूण १०.७० गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला.

कार्तिकची निवड आता विभागीय शालेय मल्लखांब स्पर्धा २०२५, बारामती येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे. या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य पद्मकांत कुदळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक लव्हाटे के. डी. यांनी कार्तिकचा सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच उपमुख्याध्यापक कोल्हे बी. के., पर्यवेक्षक दाणे आर. व्ही., क्रीडा प्रमुख चौरे, वर्गशिक्षक खाडे एस. व्ही., शालेय समिती,शालेय व्यवस्थापन समिती, पालक , विद्यार्थी व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनीही कार्तिकचे मनःपूर्वक अभिनंदन केले.






