माजी उपनगराध्यक्ष “योगेश बागुल यांच्या पुढाकाराने ३५० महिला भक्तांची श्री सप्तश्रृंगी-रेणुका माता दर्शन यात्रा”
माजी उपनगराध्यक्ष “योगेश बागुल यांच्या पुढाकाराने ३५० महिला भक्तांची श्री सप्तश्रृंगी-रेणुका माता दर्शन यात्रा”
माजी उपनगराध्यक्ष “योगेश बागुल यांच्या पुढाकाराने ३५० महिला भक्तांची श्री सप्तश्रृंगी-रेणुका माता दर्शन यात्रा”

कोपरगाव विजय कापसे दि २४ सप्टेंबर २०२५–कोपरगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी पुढाकार घेत नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा मधील जवळपास ३५० महिलांना अवघ्या १०१ रुपये नाममात्र शुल्क आकारून “श्री सप्तश्रृंगी वणी गड व श्री रेणुका माता चांदवड दर्शन यात्रेचे” आयोजन केले. या यात्रेला महिला भक्तांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

नवरात्रोत्सवात भाविक भक्त विविध शक्तिपीठांच्या दर्शनासाठी जातात;त्याच अनुषंगाने योगेश बागुल यांनी “ना नफा ना तोटा” या तत्वावर ही यात्रा आयोजित केली असून ही यात्रा बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी तिसऱ्या माळेला पहाटे ६ वाजता बाजार तळ येथून ग्रामदैवत लक्ष्मी आईं देवीची संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे,माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, माजी नगरसेविका पद्मावती बागुल अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान विक्रमादित्य सातभाई, प्रतिक्षा विक्रमादित्य सातभाई , केतकी सातभाई, कविता गोसावी, संध्या भालेराव,करूणा चव्हाण,यांच्या हस्ते आरती करून दर्शन यात्रेसाठी जाणाऱ्या वाहनांची सौ रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून दर्शन यात्रेसाठी वाहने रवाना करण्यात आली..

यावेळी भाजपा माजी शहराध्यक्ष डी आर काले,ज्ञानेश्वर गोसावी,राहूल आढाव,संजय मंडलिक, नंदुभाऊ देवळालीकर, शरद कुलकर्णी,दत्तु ऊदांवत, हेमंत चव्हाण, सुनील लोणारी, भानुदास लोणारी, गोरख कानडे , विकास शर्मा,राकेश जोशी, रविन्द्र वाघ मेजर, अभिजीत दारूंटे, राहुल आदमाने,राहुल खंडागळे, प्रीतेश जाधव, तुषार जाधव, आदित्य लोणारि, भुषण मुळिक,मयुर खंडागळे,ओम बागुल ,संकेत अधिकार,शुभम भावसार,कुणाल लोणारि,निखिल जोशी,रिकुं खडागळे, प्रतिभा कुलकर्णी सुषमाताई पांडे, वर्षा निकुंभ सारिका कुलकर्णी, भक्ती खंडागळे पुजा जोशी, बेबीताई गोसावी दिपाली शिंदे आदी उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचा बस चालक वाहक यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला
या यात्रेत संपूर्ण प्रभागातील महिला भक्त सहभागी झाल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी दर्शन यात्रा आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे




