तिडके पाटील विद्यालयात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी
तिडके पाटील विद्यालयात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी
तिडके पाटील विद्यालयात डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी

कोपरगाव विजय कापसे दि २५ सप्टेंबर २०२५–कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये थोर समाजसुधारक, शिक्षण प्रसारक आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३८ वा जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची पारंपारिक ढोल, टिपरी व लेझीमच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. सोमनाथभाऊ चांदगुडे, सचिन चांदगुडे, महेश गाडे, तुकाराम गाडे यांच्या हस्ते प्रतिमांचे व कर्मवीर रथाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी गावात ठिकठिकाणी प्रतिमेला पुष्पहार घालून औक्षण करून मिरवणुकीचे स्वागत केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे थोर देणगीदार व उद्योजक, नवी मुंबई प्रकाशराव तिडके पाटील यांनी भूषविले होते. बहुजन व शेतकऱ्यांच्या गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कमवा व शिका हा मंत्र विद्यार्थ्यांना देऊन कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. रयत शिक्षण संस्थेने शहरी भागासारख्या शैक्षणिक सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध केल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होताना दिसून येतो.विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन जीवनात यश प्राप्त करून आपली परिस्थिती बदलावी.तसेच स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कष्ट करावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. बाबुराव कोंडाजी बर्वे ॲडव्होकेट सुप्रीम कोर्ट व उच्च न्यायालय, मुंबई यांनी याप्रसंगी केले. या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी विद्यालयास पंचवीस हजार रुपयाची देणगी दिली व जिल्हा पातळीवर निवड झालेल्या मुलींच्या कबड्डी संघासाठी पाच हजार रुपयाची देणगी दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.आपल्या कुटुंबाची परिस्थिती बदलायची असेल तर कर्मवीर अण्णांनी स्वावलंबी शिक्षणाचा मंत्र दिला आहे.

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले ध्येय साध्य करावे व आपल्या विद्यालयाला सर्वतोपरी सहकार्य करावे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालयाचे माजी विद्यार्थी शरद बंडूची गाडे माजी मुख्याध्यापक के. के. वाघ विद्याभवन भाऊसाहेबनगर यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी विद्यालयासाठी अकरा हजार रुपयाची देणगी दिली. या कार्यक्रमाचे अहवाल वाचन व प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य मांडवडे ए.आर.यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय थोरात के.जी. यांनी करून दिला. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयातील श्री. राउत एस.एल. यांना विद्यालयाचा आदर्श शिक्षक व चैतन्या गरुड हिला आदर्श विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला. अदिती पगारे हिने आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी उत्तर विभाग सल्लागार मंडळाचे सदस्य सोमनाथभाऊ चांदगुडे, भास्करराव चांदगुडे, महेश गाडे, सुभाषराव गाडे, मिलिंदभाऊ तिडके, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक जामदार व्ही.एन. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पवनकुमार चांदगुडे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, पत्रकार भगीरथ गाडे, देविदास कासोदे, बापू तनपुरे, दत्तात्रय शिंदे, सूर्यभान धेनक, अनिता शिंदे, छाया पायमोडे, डॉ. इंगळे, संदीप कापसे, शुभांगी शिंदे, पत्रकार नवनाथ उल्हारे, ॲड.शितल गाडे, गणेश नागरे हिराबाई नाडेकर, बाळासाहेब पायमोडे, गणेश गवळी, अरुण सोनवणे, मनीषा तिडके, ज्योती बर्वे, सारिका बर्वे, रोहिणी पाटील, रमा पटेल, देविदास मोरे, सुनील जेजुरकर, सायली नेवासकर, सुरेखा बारगळ. मालिनी कचरे, पर्यवेक्षक दवंगे एस.यू. आदी मान्यवर, माजी विद्यार्थी, माता, पालक, पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुशारे डी.एन. व मोरे आर.के. यांनी केले तर आभार सचिनभाऊ चांदगुडे यांनी केले.




