आपला जिल्हा

स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या हातात आर्थिक सबलीकरणाची नवी ज्योत: २ कोटी ६१ लाखांचे कर्जवितरण

स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या हातात आर्थिक सबलीकरणाची नवी ज्योत: २ कोटी ६१ लाखांचे कर्जवितरण
स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या हातात आर्थिक सबलीकरणाची नवी ज्योत: २ कोटी ६१ लाखांचे कर्जवितरण

कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑक्टोबर २०२५मा. आ. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटांना तब्बल 2 कोटी 61 लाख रुपयांचे कर्जवितरण करण्यात आले. या अर्थपूर्ण उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाचा आणि ग्रामीण प्रगतीचा नवा अध्याय रचला गेला आहे.

जाहिरात

संजीवनी उद्योग समूहाच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शेकडो महिलांना व्यवसाय विस्तार, आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबनाचा नवा आधार मिळणार आहे. ग्रामीण भागातील महिला उद्योजकतेला चालना देऊन स्वयंरोजगाराच्या संधींना नवे बळ देण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे.

जाहिरात

स्नेहलताताई कोल्हे यांनी आपल्या कार्यकाळात महिला बचत गट चळवळीला बळकटी देत महिलांच्या आत्मनिर्भरतेचा वसा जोपासला आहे. महिलांना केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक बळ देण्याचे त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

जाहिरात
इतर क्षेत्रात काम करताना होणाऱ्या आनंदापेक्षाही अधिक समाधान महिलांना स्वावलंबी करताना मिळते, असे स्नेहलताताई यावेळी भावनिक शब्दांत म्हणाल्या. माझ्या सामाजिक राजकीय जीवनाची जडणघडण या महिला बचत गट चळवळीतून झाली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी हे कर्जवितरण करताना मला विशेष आनंद होत आहे.
या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा वेग मिळणार आहे. स्नेहलताताईंच्या वाढदिवसाचे औचित्य सामाजिक कार्याने अधिक अर्थपूर्ण आणि जनहितकारी ठरले आहे.मतदारसंघात हजारो नागरिक,पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित मान्यवरांनी कोल्हे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे