आपला जिल्हा

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा मंगळवारी बॉयलर अग्निप्रदीपन

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा मंगळवारी बॉयलर अग्निप्रदीपन

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा मंगळवारी बॉयलर अग्निप्रदीपन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १० ऑक्टोबर २०२५ सहकारी साखर कारखानदारीत राज्यात आदर्शवत असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५/२६ या वर्षाच्या ७१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन  समारंभ मंगळवार  (दि.१४) रोजी सकाळी १०. ०० वाजता उद्योग समुहाचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळेयांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रवीण शिंदे   त्यांच्या सुविद्य पत्नी  गौरीताई शिंदे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी दिली आहे.

जाहिरात

          कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांची ऊस उत्पादक शेतकरी हित जोपासण्याची परंपरा पुढे चालवितांना कारखान्याचे जेष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे विद्यमान चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कर्मवीर शंकरराव शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संपूर्ण नूतनीकरण करण्या येऊन पूर्ण क्षमतेने संपूर्ण नव्या युनिटवर यशस्वी गाळप हंगाम घेतले जात आहे. कारखान्याचे संपूर्ण नूतनीकरण करण्या आल्यामुळे गाळप क्षमता देखील वाढली आहे.

जाहिरात

          गळीत हंगाम सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली असून कारखान्याच्या या ७ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ बॉयलर अग्निप्रदीपन व विधिवत पूजा करून होणार आहे. या कार्यक्रमास सर्व  सभासदांनी  कारखान्यावर प्रेम करणाया हितचिंतकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ व कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे यांनी केले आहे.

कारखाना

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे