आपला जिल्हा

माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात रमले जिल्हा परिषद  शाळेच्या चिमुकल्यांमध्ये

माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात रमले जिल्हा परिषद  शाळेच्या चिमुकल्यांमध्ये

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये उत्तम गुणवत्ता–माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात

संघर्ष व प्रतिकुलतेतून मिळालेले यश मोठे

पोखरी हवेली येथील जिल्हा परिषद शाळेला भेट

संगमनेर विजय कापसे दि ११ ऑक्टोबर २०२५ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता आहे. इंग्रजी शिक्षणाचे वारे सर्वत्र वाहत असले तरी महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधून अत्यंत गुणवत्तेचे शिक्षण दिले जात असल्याने पुन्हा मराठी शाळांकडे ओढा सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेने आपली गुणवत्ता अधिक वाढवल्यास त्यांचे विद्यार्थी अधिक यशस्वी होतील असे प्रतिपादन बेस्ट ऑफ फाईव्ह चे जनक तथा माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

जाहिरात

पोखरी हवेली येथे जिल्हा परिषदेच्या शाळेला सदिच्छा भेट दिल्यानंतर ते बोलत होते यावेळी समवेत डॉ. नारायण कोल्हे ,गजानन घुले, मुख्याध्यापक एकनाथ साबळे , शिक्षक सोमनाथ मदने ,सोमनाथ थिटमे ,सचिन आगळे ,कृष्णा गवांदे गोपीनाथ आगळे, आदींसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा परिषद पोखरी हवेली शाळेने बांधलेल्या अद्यावत इमारतीची पाहणी केली. याचबरोबर अमृतवाहिनी संस्थेने दिलेल्या इंटरॅक्टिव्ह बोर्डची पाहणी केली. माजी शिक्षण मंत्री थेट वर्गात आल्याने सर्व विद्यार्थी भारावून गेले. टीव्हीवर दिसणारे साहेब आपल्या वर्गात आल्याने विद्यार्थी आनंदाने नाचू लागले. पुष्पगुच्छ व टाळ्यांच्या गजरात या चिमुकल्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अत्यंत सहजतेने लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या चिमुकल्यांशी संवाद साधला.

जाहिरात

यावेळी माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहजतेने कोणतीही गोष्ट न मिळाल्याने जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी आत्मनिर्भरता निर्माण होते. स्पर्धेमध्ये हे विद्यार्थी टिकून राहतात. आज यशस्वी झालेल्या व्यक्तींमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेल्या व्यक्तिमत्त्वांची जास्त संख्या आहे.

जाहिरात

मराठी आणि इंग्रजी या दोन्हीही भाषा महत्त्वाच्या आहेत. इंग्रजी माध्यमांकडे मध्यंतरी खूप मोठा ओढा निर्माण झाला होता. परंतु जिल्हा परिषद शाळेची वाढलेली गुणवत्ता आणि त्यातून दिले जाणारे सहजतेचे शिक्षण यामुळे अनेक विद्यार्थी पुन्हा इंग्रजी शाळांमधून मराठी शाळेत आले आहे आणि संगमनेर तालुक्यात ही संख्या आनंददायी आहे.

जाहिरात

अगदी गोरगरीब नागरिक व वाढीवस्तीवरील विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे याकरता शिक्षणाचा मूलभूत अधिकार आपण राबविला. याचबरोबर केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांबरोबर आपल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी याकरता बेस्ट ऑफ फाईव्ह चानिर्णय लागू केला.

जिल्हा परिषद शाळेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण कायम आग्रह केला. याकरता तालुक्यात इंग्रजी व गणित या विषयात अधिक प्राविण्य यावे याकरता विशेष योजना राबविण्यात आली. यातून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारण्याचे समाधान आहेच. याचबरोबर आपल्या तालुक्यातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीपणे काम करत असल्याचा अभिमानही असल्याचे ते म्हणाले.

सरकारने पायाभूत शिक्षणावर अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे यावेळी माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून या प्रसंगी त्यांनी पोखरी  शाळेने राबवलेल्या विविध उपक्रमाबद्दल कौतुक केले.

तर डॉ.नारायण कोल्हे म्हणाले की, शिक्षकांची मेहनत आणि ग्रामस्थांचे सहकार्य यातून पोखरी हवेली शाळा ही नक्कीच आदर्शवत झाली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी ग्रामीण शिक्षणाचा पॅटर्न अधिक विकसित केला असल्याचे ते म्हणाले.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सर्व विद्यार्थ्यांची संवाद साधतात सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून पुष्पगुच्छ देऊन व आनंदाने स्वागत केले.

साहेबांना पाहून चिमुकले हरकून गेले

माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात मधल्या सुट्टीमध्ये अचानक शाळेमध्ये आल्याने सर्व विद्यार्थी आनंदाने नाचू लागले .आमचे साहेब आले ,आमचे साहेब आले असे म्हणून सर्वांनी मा. शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांना गराडा घातला यावेळी अनेकांनी हस्तांदोलन केले तर शाळेचे सर्व इमारत व कामकाज पाहून मुख्याध्यापक, ग्राम व्यवस्थापन समिती ग्रामस्थ  व सर्व शिक्षकांचे  माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विशेष कौतुक केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे