आपला जिल्हा

शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी अभ्यासु युवा नेतृत्व अमित कोल्हे

शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी अभ्यासु युवा नेतृत्व अमित कोल्हे
वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा अमितदादा कोल्हे
कोपरगाव विजय कापसे दि २५ जुलै २०२५–  माजी मंत्री सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव येथे परिसरातील सर्वाना हक्काचे उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने लावलेल्या संजीवनी शैक्षणिक संस्थेच्या रोपट्याचे आता एका महा वटवृक्षात रूपांतर होत असून या संस्थेचे खंबीर नेतृत्व करत असलेले संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित नितीन दादा कोल्हे हे आधुनिक शिक्षणाची दूरदृष्टी ठेवून काम करणारे खंबीर नेतृत्व असल्याचे मत कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर यांनी अमित कोल्हे यांचा आज असलेल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना व्यक्त केले.

जाहिरात
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी स्थापन केलेल्या संजीवनी शिक्षण संस्था उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नावाजलेली आधुनिक शिक्षणाची कास धरून चालणारी संस्था असून सर्वात जास्त अभ्यासक्रम असलेली तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देश विदेशात मोठ्या प्रमाणात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळवून देणारी संस्था असून या संस्थेचे नेतृत्व करणारे अमित कोल्हे हे अत्यंत उच्च शिक्षित असून त्यांनी के.जी ते पी.जी पर्यंतचे सर्व अभ्यासक्रम सुरू करत आज अनेक विद्यार्थी यशस्वी होऊन देश-विदेशात गावाचे व संस्थेचे नाव उज्वल करत आहे.

जाहिरात
 अमित दादांना वडील नितीनदादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाच अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असून तर बंधू संजीवनी सहकारी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, संजय शैक्षणिक विश्वस्त सुमित कोल्हे, ईशान कोल्हे यांची मोलाची साथ भेटत असून आज संस्थेत १५ हजाराहून अधिकचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे.

जाहिरात
मागील वर्षी संजीवनी शैक्षणिक संस्थेला विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याने आता संजीवनी युनिव्हर्सिटी अत्यंत विश्वसनीय व उच्च प्रतीचे शिक्षण देणारी संस्था म्हणून संपूर्ण देशभरात नावजली असून प्रवेशासाठी सबंध देशभरातून विद्यार्थी व पालकांची मोठी झुंबड पाहावयास मिळत असते.

जाहिरात
आज शुक्रवार दिनांक २५ जुलै रोजी अमित दादांच्या वाढदिवसानिमित्त माजी सभापती सुनील देवकर, संजीवनी युनिव्हर्सिटीचे विश्वस्त सुमित कोल्हे, राजेंद्र चांडे, प्रदीप चांदर, राहुल झावरे, अजय भिंगारे, शरद सांगळे, किशोर दरेकर, जालू आढाव, प्रवीण भोसले आदींनी सत्कार करत शुभेच्छा देताना संजीवनी  युनिव्हर्सिटी मध्ये सध्या संपूर्ण देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेत आणि ही अभिमानास्पद बाब आहेच परंतु भविष्यात जगभरातील विद्यार्थी देखील  शिक्षण घेण्यासाठी येतील असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे