आमदार आशुतोष काळे

निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्व पाझर तलाव लघु बंधारे भरून द्या आ. आशुतोष काळेंच्या सूचना

निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्व पाझर तलाव लघु बंधारे भरून द्या आ. आशुतोष काळेंच्या सूचना

निळवंडे लाभ क्षेत्रातील सर्व पाझर तलाव लघु बंधारे भरून द्या आ. आशुतोष काळेंच्या सूचना

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २४ जानेवारी २०२५ :- मागील वर्षी उन्हाळ्यात योग्य नियोजन केल्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही. त्याप्रमाणेच यावर्षी देखील नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार नाही याची काळजी घेवून निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव, गाव बंधारे, पाणी पुरवठा योजनांचे तलाव पूर्ण क्षमतेने भरून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभाग व प्रशासनाला दिल्या आहेत.

जाहिरात

चालूवर्षी सर्वच धरणक्षेत्रात चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वच धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा आहे याला निळवंडे धरण देखील अपवाद नाही. जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात उन्हाचा चटका जाणवत असल्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे साहजिकच पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. मागील वर्षी पाट बंधारे विभागाने केलेल्या नियोजनानुसार निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील जिरायती भागातील नागरिकांना पाण्याची टंचाई जाणवली नाही त्यामुळे दरवर्षीप्रमाणे  पिण्याच्या पाण्याच्या टँकरची वाट पाहण्याची वेळ नागरिकांवर आली नाही व टँकरवर होणारा भरमसाठ खर्च देखील वाचला आहे. त्याच धर्तीवर यावर्षी देखील योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील गावे मागील कित्येक दशकांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत होती. कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या या जिरायती गावातील नागरिकांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या अडचणी सोडविण्यासाठी मागील दोन वर्षापासून केलेल्या प्रयत्नातून निळवंडे डाव्या कालव्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध  झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

जाहिरात आत्मा

या सर्व लाभक्षेत्राच्या गावातील सर्व पाझर तलाव,लघु बंधारे, गावबंधारे व पाणी पुरवठा योजनांचे तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यासाठी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी पाण्याची नासाडी होणार नाही याचे योग्य नियोजन करून निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावातील सर्व पाणी पुरवठ्याचे पाझर तलाव व लघु बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावेत जेणेकरून नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत व नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभाग व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे