आपला जिल्हा

जिल्हा आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉ.  किरण आहेर यांची जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती

जिल्हा आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉ.  किरण आहेर यांची जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती

जिल्हा आरोग्य योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डॉ.  किरण आहेर यांची जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती

अहिल्यानगर विजय कापसे दि १३ ऑक्टोबर २०२५अहिल्यानगर जिल्ह्यात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अशासकीय सदस्यपदी डॉ. किरण आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जाहिरात

ही नियुक्ती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार करण्यात आली असून, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी या संदर्भातील नियुक्तीपत्र डॉ. किरण आहेर यांना प्रदान केले.

वैद्यकीय क्षेत्रातील दीर्घ अनुभव, ग्रामीण आरोग्य सेवेतील कार्यतत्परता आणि सेवाभावी दृष्टिकोन यामुळे डॉ. आहेर यांचे योगदान समितीच्या कामकाजासाठी निश्चितच मोलाचे ठरणार आहे, असा विश्वास आरोग्यवर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

जाहिरात

डॉ. आहेर हे अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात आरोग्य जनजागृती, मोफत आरोग्य शिबिरे आणि विविध सरकारी योजनांच्या तळागाळातील अंमलबजावणीसाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील रुग्णसेवा, लाभार्थ्यांपर्यंत योजनांचे फायदे आणि आरोग्य क्षेत्रातील समन्वय अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या नियुक्तीबद्दल मा. खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, वैद्यकीय संचालक प्रा. डॉ. अभिजित दिवटे, तसेच डायरेक्टर (क्लिनिकल सर्व्हिसेस) ब्रिगेडियर डॉ. अरुण त्यागी यांनी डॉ. किरण आहेर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

आरोग्य योजनांच्या पारदर्शक आणि परिणामकारक अंमलबजावणीसाठी तांत्रिक मार्गदर्शन, रुग्णांना वेळेवर मदत आणि जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमधील समन्वय यासाठी डॉ. आहेर यांचा अनुभव समितीस निश्चितच लाभदायक ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे