आपला जिल्हा

शिंगणापूरात ५ वर्षाच्या चिमुकल्या वर बिबट्याचा हल्ला

शिंगणापूरात ५ वर्षाच्या चिमुकल्या वर बिबट्याचा हल्ला
शिंगणापूरात ५ वर्षाच्या चिमुकल्या वर बिबट्याचा हल्ला
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २२ ऑक्टोबर २०२५- सध्या सर्वत्र मानवी लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून यात प्रामुख्याने बिबट्या या प्राण्याचा  वावर आहे या बिबट्याने अनेक ठिकाणी मनुष्यासह पाळीव प्राण्यावर हल्ले करत त्यांचा फडशा पाडल्याच्या घटना दररोज घडत असतांना अशीच एक घटना कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील एका ५ वर्षीय बालकावर बिबट्याने अचानकपणे  हल्ला करत त्याला जखमी केल्याने परिसरात भीतीचे वातावरण  वातावरण पसरले आहे.

जाहिरात
सविस्तर वृत्त असे की, मंगळवार दि २१ ऑक्टोबर  रोजी लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील डांबरा नाल्याच्या कडेला असलेल्या गायकवाड वस्तीवर दिनेश तुळशीराम पवार हा ५ वर्षीय बालक आपल्या घरासमोर खेळत असतांना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने तो या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून थोडक्यात त्याच्यावरील विघ्न टळले आहे तर त्याला  उपचारासाठी कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करत पुढील उपचार करीता अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून कुटुंब भीतीने भयभीत झाले आहे.

जाहिरात
 सदर परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर असून प्रशासन व वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करत नागरिकांना दिलासा देत सदर जखमी बालकाच्या कुटूंबास आर्थिक मदत करावी असे आवाहन गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनी केली आहे. तर सदर घटनेची  माहिती मिळताच प्रभारी कोपरगाव वनरक्षक निलेश रोडे यांनी त्यांच्या पथकाला सदर ठिकाणी पाठवत सदर घटनेचा पंचनामा केला आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे