आपला जिल्हा

टाकळीमध्ये उसाला लागलेली आग युवकांनी एकत्र येत विझवली

टाकळीमध्ये उसाला लागलेली आग युवकांनी एकत्र येत विझवली
टाकळीमध्ये उसाला लागलेली आग युवकांनी एकत्र येत विझवली
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २४ ऑक्टोबर २०२५कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील प्रगतशील शेतकरी वासुदेव कारभारी देवकर यांचा गट नंबर १८० मधील कारखान्याच्या चालु गळीतास आलेल्या एक एकर उसाच्या क्षेत्रास आज शुक्रवार दि २४ ऑक्टोबर रोजी विजेच्या ताराचे शॉट सर्किट होऊन आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

जाहिरात
सदर आग लागलेल्या उसाच्या शेता शेजारी वस्ती असलेल्या निखिल देवकर यांनी बघितले उसात फार मोठा जाळ दिसला असता त्यांनी तात्काळ फोन करून गजानन देवकर यांच्यासह संपूर्ण देवकर वस्ती येथील युवकांना कळविले असता सर्वांनी एकत्र येत सदरची आग आटोक्यात आणण्यास महत्त्वाची भूमिका केली.सदरची आग वेळीच आटोक्यात आली अन्यथा शेजारी असलेल्या ऊस,मका आदी काढणीला आलेल्या पिंकाची फार मोठी हानी टळली या प्रसंगी माजी सभापती सुनिल देवकर, राजकिरण देवक,र भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सतीश देवकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शशिकांत देवकर, उपसरपंच संजय देवकर, शाम भोकरे, प्रवीण मालकर, प्रसाद मालकर, अनिल बापूसाहेब देवकर, पांडुरंग देवकर, निखिल देवकर, गजानन देवकर, आप्पासाहेब देवकर, पिंटू देवकर, जगन्नाथ देवकर, साहिल देवकर, ओम देवकर, बापू मालकर, भाऊसाहेब देवकर, परसराम देवकर, गोरख देवकर, सतिष मालकर, राजीव बापु देवकर, भाऊसाहेब मालकर, बद्रीनाथ शेलार आदिनी पाठीवरील पेट्रोल पंपाने पाणी मारून आग  नियंत्रणस भारतीय जनता पार्टीचे बुथ प्रमुख अनिल पांडुरंग देवकर यांनी चांगले प्रयत्न केले.

जाहिरात
सदर प्रसंगी एम एस सी बी चे वायरमन निकम साहेब हुळेकर साहेब आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे शेतकी विभागाचे सुशांत  आहेर साहेब यांनी पाहणी केली  सदर जाळलेल्या उसाचा पंचनामा करण्यात यावा अशी सर्वांनी मागणी केली

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे