आपला जिल्हा

आमदार सत्यजित तांबे यांच्या मागणीनंतर भाषा मंत्री उदय सामंत यांची नाट्यगृहाला भेट

आमदार सत्यजित तांबे यांच्या मागणीनंतर भाषा मंत्री उदय सामंत यांची नाट्यगृहाला भेट

कवी अनंत फंदी नाट्यगृह अधिक सुसज्ज व्हावे याकरता मदत करणार

संगमनेर विजय कापसे दि २ नोव्हेंबर २०२५लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यामध्ये अत्यंत वैभवशाली व प्रशस्त आणि अद्यावत इमारती उभ्या राहिल्या असून संगमनेर शहराच्या वैभवात भर टाकणारे कवी अनंत फंदी खुले नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात आहे या नाट्यगृहाला भेट द्यावी अशी मागणी आमदार सत्यजित तांबे व नाट्यपरिषद यांनी केली होती यानुसार भाषा मंत्री उदय सामंत यांनी नाट्यगृहाची पाहणी केली.

जाहिरात

उद्योग व भाषा मंत्री उदय सामंत यांनी कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या कामाची पाहणी केली. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती धनश्री पवार, यावेळी नाट्य परिषदेचे सदस्य प्रा.डॉ. संजय दळवी यांच्यासह संगमनेर नाट्य परिषदेचे सर्व विश्वस्त व रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

उद्योग मंत्री नामदार उदय सामंत हे संगमनेर शहरांमध्ये येत असल्याने संगमनेर शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या कवी अनंत फंदी खुले नाट्य गृहाला भेट द्यावी अशी मागणी संगमनेर नाट्य परिषदेचे सर्व सदस्य व आमदार सत्यजित तांबे यांनी केली होती. याबाबतचे पत्र आमदार तांबे यांनी मंत्री उदय सामंत यांना दिले होते या मागणीनुसार उदय सामंत यांनी भेट दिली.

जाहिरात

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर हे केवळ व्यापार आणि शिक्षणाचे केंद्र नसून समृद्ध आणि सांस्कृतिक साहित्य परंपरेचे केंद्र ठरले आहे. उत्तर पेशवाईत गाजलेले थोर संत कवी अनंत फंदी यांचे संगमनेरात वास्तव्य राहिले. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी भव्य नाट्यगृह उभारण्याची संकल्पना राबवली. नगर परिषदेच्या माध्यमातून साडेतीन कोटींची निधी उभारणी करून नाट्यगृहाचे काम सुरू केले त्याचबरोबर 2021 – 22 मध्ये महसूल मंत्री असताना नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत बंदिस्त नाट्यगृह विकसित करण्यासाठी 7.99 कोटींचा निधी मंजूर करून घेतला.

या अंतर्गत नाट्यगृहाचे अनेक कामे पूर्ण झाले असून आतील सुसज्जता ध्वनी प्रणाली व असं व्यवस्था आणि परिसराचे सौंदर्य करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या सर्व कामांना गती मिळावी याकरता अधिक निधीची गरज आहे. त्यामुळे भाषा व उद्योग मंत्री यांनी या नाट्यगृहाला भेट द्यावी अशी मागणी आमदार तांबे यांनी केली होती.

यावेळी भाषा मंत्री ना.उदय सामंत म्हणाले की, झालेले नाट्यगृह हे अत्यंत अद्यावत व शहराच्या वैभवात भर टाकणारे आहे. स्थानिक प्रशासनाने संगमनेर मधील रंगकर्मी व या क्षेत्रातील जाणकारांचे मत जाणून घेणे गरजेचे आहे. त्यांना सोबत घेऊन काम करा. या सभागृहात अधिक चांगले काय करता येईल यासाठी आपला सातत्याने प्रयत्न राहणार असून आवश्यक असणारी सर्व मदत देऊन संगमनेर मध्ये अद्यावत नाट्यगृह उभे राहील यासाठी आपण प्रयत्न करू असे ते म्हणाले.

याप्रसंगी डॉ.संजय दळवी यांनी प्रास्ताविकाद्वारे त्यांना सर्व माहिती सांगितली तर संगमनेर नाट्य व रंगकर्मी यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे