नवशिक्षकांसाठी प्रेरणादायी प्रशिक्षणाचा समारोप: सक्षम शिक्षक घडवण्याचा संकल्प
नवशिक्षकांसाठी प्रेरणादायी प्रशिक्षणाचा समारोप: सक्षम शिक्षक घडवण्याचा संकल्प
कोकमठाण व अहिल्यानगर येथे ८२१ शिक्षकांचा सहभाग
अहिल्यानगर विजय कापसे दि ५ नोव्हेंबर २०२५–
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कोकमठाण आणि अहिल्यानगर येथे नवनियुक्त शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा शानदार समारोप करण्यात आला. या राज्यस्तरीय प्रशिक्षणात एकूण ८२१ नवशिक्षकांनी सहभाग घेतला. कोकमठाणच्या आत्मा मलिक शैक्षणिक संकुलात ४०६ तर अहिल्यानगरच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये ४१५ शिक्षक उपस्थित होते.

समन्वयकांचं नियोजन, सुलभकांचं मार्गदर्शन — “प्रशिक्षण ऊर्जा देणारं ठरलं” डायटचे प्राचार्य डॉ. राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ अधिव्याख्याता आणि जिल्हा प्रशिक्षण समन्वयक अरुण भांगरे यांच्या नेतृत्वाखाली कोकमठाण येथील प्रशिक्षणाचा समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आत्मा मालिक ध्यानपीठाचे कोषाध्यक्ष विवेकानंद महाराज, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, कोपरगाव गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, केंद्रप्रमुख महानुभव,सुलभक व शिक्षक भारती संघटना पुणे विभाग कार्याध्यक्ष महेश पाडेकर, प्रशिक्षण सहायक अनमोल होन उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक डॉ. अरविंद सगभोर यांनी केले. प्रशिक्षणासाठी मोलाचे योगदान देणारे सुलभक, मार्गदर्शक यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये अनमोल होन,महेश पाडेकर,चंद्रशेखर हासे, प्रकाश पारखे, डॉ. अरविंद सगभोर, ज्योत्स्ना खोजे,अभिजीत वाघ, जालिंदर गागरे, डॉ. शरद दुधाट, विजय देशमुख, वेरोनिका गायकवाड, कैलास वाघमारे, संजय गडकर, माधुरी ठुबे, सुनीता इंगळे, प्रतीक्षा काळे, वैशाली सोनवणे, मल्लिका शेख, कुलदीप गोसावी, शुभांगी भरसाकळ, भारती वक्ते,किरण बांडे, विजय कातडे, आदींचा समावेश होता.

“ नव्याने सेवेत दाखल नव नियुक्त शिक्षकांना शिक्षणाच्या कार्य संस्कृती शी सहजतेने जुळवून घेता येणे,त्यांचा आत्म विश्वास वाढविणे हा प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता.नव नियुक्त शिक्षकांना पुढील सेवेसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षण, नवोपक्रम यांचे माध्यमातून शिक्षकां सोबत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचे काम डायट मार्फत केले जात आहे ” — अरुण भांगरे, वरिष्ठ अधिव्याख्याता
या प्रशिक्षणात प्रशासनिक व शैक्षणिक बाबींचे मार्गदर्शन ,मूल्यमापन तंत्रे व व्यावसायिक मानके,
सेवा नियमावली, कायदे, योजनांची माहिती,बालकांचा शिक्षणाचा अधिकार कायदा, बाल हक्क,सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE),SCERT, DIET आणि इतर संस्थांची भूमिका. इ. महत्वपूर्ण घटकांवर मार्गदर्शन करण्यात आले.समारोप प्रसंगी शाहिस्ता शेख, शुभम पवार आणि भगवान ढगे या प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण अनुभव शेअर करताना हे प्रशिक्षण “उपयुक्त, संस्कारशील आणि मार्गदर्शक” असल्याचे सांगितले. समारोप कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षणार्थी स्वप्निल हारदे, अर्जुन सुरपल्ली, सचिन चव्हाण, अनिल म्हस्के यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी अनुजा आभाळे आणि सोनाली गोराडे यांनी केले, तर आभार ब्रिजपाल सर यांनी मानले.



