डॉ भाग्यश्री घायतडकर प्रभाग ५ मधील इच्छुक उमेदवार?
डॉ भाग्यश्री घायतडकर प्रभाग ५ मधील इच्छुक उमेदवार?
डॉ भाग्यश्री घायतडकर प्रभाग ५ मधील इच्छुक उमेदवार?
कोपरगाव विजय कापसे दि ७ नोव्हेंबर २०२५– नुकत्याच नगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून कोपरगाव शहरातील १५ प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली असल्याने पक्षाच्या नेत्यांपुढे मोठा पेज प्रसंग पहावयास मिळत असला तरी शहरातील प्रभाग क्रमांक ५ मध्ये एक उच्च शिक्षित तरुण तडफदार उमेदवार म्हणून आमदार आशुतोष काळे गटाकडून डॉ भाग्यश्री कुणाल घायतडकर या उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असून प्रभागामधून देखील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
डॉ भाग्यश्री घायतडकर यांनी आपले पती डॉ. घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ कुणाल अशोकराव घायतडकर यांच्या समवेत कोरोना महामारीत आपला जीव धोक्यात घालत मोठ्या प्रमाणात रुग्ण सेवा करत अनेक रुग्णांचे प्राण वाचविले आहे त्यांच्या कार्याची दखल घेत डॉ घायतडकर पाटील दांपत्यांचा तत्कालीन महाराष्ट्र शासनाच्या वतीने गौरव करण्यात आला होता.
डॉ भाग्यश्री घायतडकर यांचे संघटन कौशल्य अत्यंत मजबूत असून त्यांनी आपल्या प्रभागातील लहान थोर सर्वच महिलांना आपलेसे केलेले आहे तसेच ते राहत असलेल्या प्रभाग क्रमांक ५ मधील शारदानगर येथे मोठ्या प्रमाणात साजरे होणारी नवरात्र उत्सव, गणपती उत्सव आदि सामाजिक धार्मिक कार्यात हिररीने सहभागी होते ते कार्य तडीस नेत असतात.
त्यांचे पती डॉ.कुणाल घायतडकर यांनी देखील आमदार आशुतोष काळे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करत प्रभागातील रस्ते, लाईट, गटारी आदि महत्त्वाचे कामे मार्गी लावली आहेत आहे. तसेच आपल्या डॉ घायतडकर पाटील डेंटल हॉस्पिटल मध्ये गेल्या अनेक वर्षापासून वर्षातून २ महिने मोफत दंत तपासणी शिबीर तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त अवाढव्य खर्चाला फाटा देत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करत असतात तर प्रभागात अनेक ठिकाणी देशी वृक्षांची लागवड संवर्धन करत निसर्ग संवर्धनाचा संदेश देत असतात. अशा एक ना अनेक सामाजिक धार्मिक कार्यात नेहमीच आग्रेसर असणारे नेहमीच सर्वांच्या सुखदुःखात मदतीसाठी तत्पर धावून जाणारे डॉ घायतडकर दाम्पत्यांच्या सामाजिक कार्याचा राज्यभरातील अनेक संस्थांनी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव केला आहे ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.
अशी उच्च शिक्षित तरुण तडफदार डॉ भाग्यश्री कुणाल घायतडकर यांना प्रभाग क्रमांक ५ मधून देखील मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याने त्यांना आमदार आशुतोष काळे गटाकडून नगरसेवक पदाची उमेदवारी मिळावी अशी इच्छा असून निवडून आल्यानंतर मी सदैव प्रभाग ५ च्या विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांच्याकडे प्रयत्न करून सर्वांगीण विकास करण्यावर भर देणार असल्याचे डॉ भाग्यश्री घायतडकर यांनी सांगितले.





