आपला जिल्हा

झाडांचे शहर म्हणून संगमनेरची नवी ओळख; गर्द झाडांमुळे हिरवाईसह ऑक्सिजन मध्ये वाढ

झाडांचे शहर म्हणून संगमनेरची नवी ओळख; गर्द झाडांमुळे हिरवाईसह ऑक्सिजन मध्ये वाढ
झाडांचे शहर म्हणून संगमनेरची नवी ओळख; गर्द झाडांमुळे हिरवाईसह ऑक्सिजन मध्ये वाढ
जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि ९ नोव्हेंबर २०२५काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सततच्या विकास कामांमधून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरात तत्कालीन नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे यांच्या पुढाकारातून झालेल्या वृक्ष लागवडीमुळे संगमनेर शहराची ओळख आता झाडांचे शहर म्हणून होऊ लागली असून हिरवाईसह मिळणारा जास्त ऑक्सिजन नागरिकांसाठी आनंद देणार आहे.

जाहिरात
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दंडकारण्य अभियान अंतर्गत सौ. दुर्गाताई तांबे यांनी संगमनेर शहरांमध्ये स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर व हरित संगमनेर ही संकल्पना राबवली. यामध्ये संगमनेर मधील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला. नगरपरिषदेच्या वतीने मोकळ्या जागेमध्ये तसेच रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी नगरपालिकेसह स्थानिक नागरिकांनी घेतली. याचबरोबर महिलांनी आपल्या घराच्या परिसरात छोट्या गार्डन उभारून परसबागा निर्माण केल्या. तर काही महिलांनी छतावर आपल्या परसबागा उभारल्या.

जाहिरात

यामुळे संगमनेर शहरांमध्ये वृक्षांची संख्या जास्त झाली असल्याने आता सर्वत्र हिरवाई दिसू लागली आहे. स्वच्छतेसाठी सौ.दुर्गाताई तांबे यांनी पुढाकार घेतला त्यामध्ये नागरिक व महिलांचा सहभाग घेऊन ओला कचरा व सुका कचरा हा अभिनव उपक्रम राबवला. सार्वजनिक ठिकाणची स्वच्छतेसह आपल्या परिसराच्या स्वच्छतेमुळे संगमनेर हे स्वच्छ व विकसित शहर म्हणून राज्यात ओळखले जाऊ लागले.

जाहिरात

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून संगमनेरमध्ये हायटेक बस स्थानकासह असलेल्या सर्व वैभवशाली इमारती, हॅपी हायवे, शांतता, सुव्यवस्था,समृद्ध बाजारपेठ, शैक्षणिक व मेडिकल हब या अत्यंत जमेच्या बाजू आहे. याचबरोबर राज्यामध्ये पाण्यासाठी वन वन असताना संगमनेर शहरवासी यांना निळवंडे धरण थेट पाईपलाईन योजनेमधून मुबलक व स्वच्छ पाणी दररोज मिळत आहे.

कोरोना संकटामध्ये सर्वांना ऑक्सिजनचे मोठे महत्त्व कळाले याच पार्श्वभूमीवर वृक्षरोपण व संवर्धनाचे महत्त्व वाढले संगमनेर मध्ये जास्त वनराईमुळे उष्णता कमी झाली असून ऑक्सिजनचे प्रमाण वाढले आहे. ऑक्सिजन हब शहर म्हणून संगमनेरचा गौरवपूर्ण उल्लेख होतो आहे.

सजीव सृष्टीसाठी आणि आरोग्यासाठी वृक्ष ही अत्यंत महत्त्वाचे असून या उपक्रमाला राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार मिळाले आहेत.

स्वच्छ व सुंदर आणि हिरव्या संगमनेरचा अभिमान

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर हे अत्यंत सुसंस्कृत शांत विकसित आणि वृक्षांनी बहरलेले आहे. या विकासाच्या वाटचालीत सुजाण संगमनेर करांचा मोठा वाटा असून स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर व हरित संगमनेर ही संकल्पना राबवणाऱ्या संगमनेरकर असल्याचा आम्हा तरुणांना कायम अभिमान आहे.

डॉ.प्रांजली दिघे ( विद्यार्थिनी मेडिकल कॉलेज )

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे