आपला जिल्हा

मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

पुणे – नाशिक महामार्गाचे काँक्रिटीकरण काम वेगात

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १३ नोव्हेंबर २०२५ संगमनेर शहरात सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवणारे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून इंजिनिअरिंग कॉलेज समोरील हॉटेल स्टेटस च्या समोर असलेला उड्डाणपूल दुहेरी वाहतुकीसाठी खुला झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पुणे – नाशिक महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे कामही वेगाने सुरू आहे.

जाहिरात

संगमनेर शहरातील वर्दळ कमी व्हावी याकरता माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पुणे – नाशिक महामार्गावर बायपास मंजूर करून घेतला. पुणे नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आणि हा रस्ता महाराष्ट्रातील एक आदर्श रस्ता निर्माण झाला. विविध ठिकाणी यावर उड्डाणपूल टाकले गेले 2014 मध्ये नागरिकांसाठी हा बायपास खुला केला होता. याचबरोबर घुलेवाडी, सुकेवाडी हा बायपास झाल्याने अनेक वाहने त्या मार्गाने वळवली जात होती त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली.

जाहिरात

याचबरोबर इंजीनियरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक हा हॅप्पी हायवे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत आदर्शवत बनवला असून संगमनेर शहराच्या वैभवात भर टाकणारा हा रस्ता ठरला आहे. घुलेवाडी येथील माझे घर सोसायटी लगत असलेल्या हॉटेल स्टेटस समोर (नाशिक जंक्शन) पुणे नाशिक महामार्गावरून संगमनेरकडे येताना व महामार्गावर जाताना रस्त्याच्या गुंतागुंतीमुळे हा भाग अपघात प्रवण क्षेत्र म्हणून झाला होता. या ठिकाणी अनेक अपघात झाल्याने लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आपल्या वैयक्तिक संबंधातून पाठपुरावा करत उड्डाणपुलाच्या कामाकरता 38 कोटी रुपयांचा निधी मिळवला होता.

स्थानिक नागरिकांच्या अडचणींमुळे एका बाजूचा पूल काही दिवस खोळंबला होता परंतु लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्थानिक नागरिकांना विश्वासात घेत या अडचणी दूर केल्या आणि पुन्हा काम वेगाने सुरू झाले. आता या रस्त्याचे पूर्ण कॉंक्रिटीकरण झाले असून दोन्ही बाजूने हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय कळली असून संगमनेर शहराकडे येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्याचे कामही पूर्णत्वाकडे जात आहे.

संगमनेर शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या या उड्डाणपुलाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून नाशिक पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांना विना अडथळा उड्डाणपुलावरून प्रवास करता येत असल्याने हा प्रवास अत्यंत सुखद झाला आहे.

या उड्डाणपुलासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचाच पाठपुरावा

नाशिक – पुणे चौपदरीकरण महामार्गावर हॉटेल स्टेटस समोर उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे होते. अनेक अपघात या ठिकाणी झाल्याने लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तातडीने हा उड्डाणपूल मंजूर करून घेतला. मागील दीड वर्षापासून या उड्डाणपुलाचे काम सुरू होते मात्र आता हा उड्डाणपूल सुरू झाल्याने बाहेरील वाहनांना सरळ जाता येत असल्याने वाहतुकीची कोंडी कमी झाली आहे. या सर्व कामाचे श्रेय लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे असून आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांचे अभिनंदन करत असल्याचे स्थानिक नागरिक तुषार गोडगे,मच्छिंद्र ढमाले,अनिल के.राऊत,नितीन सांगळे,राजेंद्र पानसरे,सुमित पानसरे,मेजर संजय राहणे,संतोष पुरी व परिसरातील नागरिकांनी म्हटले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे