आपला जिल्हा

भंडारदरा लाभक्षेत्रातील खरीप पिकांसाठी सोमवार पासून आवर्तन – जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील

भंडारदरा लाभक्षेत्रातील खरीप पिकांसाठी सोमवार पासून आवर्तन – जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील

भंडारदरा लाभक्षेत्रातील खरीप पिकांसाठी सोमवार पासून आवर्तन – जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील

Loni vijay kapse दि १३ सप्टेंबर २०२६– भंडारदरा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यातून खरीपाचे आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

जाहिरात

लाभक्षेत्रात यंदाच्या वर्षी सरासरीइतका पाऊस न झाल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेती पिकांसाठी तसेच काही गावांमधील पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने आवर्तन सुरू करावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे केली होती.

जाहिरात

या संदर्भात मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीतही प्रामुख्याने खरीप पिकांना जीवदान मिळावे म्हणून आवर्तनाच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. धरणातील उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन जलसंपदा मंत्र्यांनी सोमवार, दिनांक १४ सप्टेंबर २०२६ पासून खरीप पिकांसाठी आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले आहेत. जलसंपदा विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे लाभक्षेत्रातील खरीप पिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे