नाशिक – पुणे रेल्वे चक्काजाम आंदोलन देशाचे लक्ष वेधनार; हक्काच्या रेल्वेसाठी महामार्गावरील सर्व तालुके एकवटले

क्रांतीदिनी चक्काजामचा महाएल्गार ; महायुतीच्या सत्ताधाऱ्यांची पळापळ

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी 9 ऑगस्ट क्रांती दिन नाशिक – पुणे महामार्गावर चक्काजामची घोषणा केली आहे. नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्ग व्हावा याकरता त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र महायुती सरकारने पुण्यावरून पुलतांबा असा गैरसोयीचा मार्ग तयार केला असून यामुळे या भागातील नागरिकांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी या महामार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन केले त्यानंतर केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री महाराष्ट्रातील विविध मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र आता रस्त्यावर लढाई शिवाय पर्याय नसून ही लढाई कोणत्या एका राजकीय पक्षाची नाही तर भविष्यातील शंभर वर्षांची आहे. शिक्षण बेरोजगारी नोकरी व्यापार व्यवसाय शेती या सर्व बाबींसाठी नाशिक पुणे ही रेल्वे अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही सरळ मार्गेच झाली पाहिजे ही सर्वांची मागणी आहे.

याकरता सर्व लोकप्रतिनिधी एकवटले आहे. प्रत्येक तालुक्यांमध्ये गावागावांमध्ये जनजागृती सुरू झाली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका अस्मिता म्हणून एकत्र झाला आहे. तरुणाई नागरिक महिला युवक सर्व एकत्र येत आहेत. गावोगावी नऊ ऑगस्ट च्या क्रांती दिनाच्या निमित्ताने सरळ हक्काच्या रेल्वेसाठी जागृती केली जात आहे यामध्ये तरुणांचा विशेष मोठा सहभाग आहे.
विशेष म्हणजे हा रेल्वे मार्ग सरळ संगमनेर नारायणगाव मार्गे नियोजित झाला होता याकरता 684.62 कोटी निधी शेतकऱ्यांना देण्यात आला असून या अंतर्गत 99.18 हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात आली होती मात्र आता हा प्रकल्प रद्द झाल्याने हा निधी परत घेतला जाणार असल्याचीही सरकारने जाहीर केले आहे.
महायुती सरकारमधील सध्याचे पालकमंत्री व संगमनेरचे महायुतीचे नवीन लोकप्रतिनिधी यांनी सुरुवातीला ही नेहरू गार्डन मधील रेल्वे आहे का अशी टिप्पणी केली होती. मात्र राजकीय हस्तक्षेपातून हा रेल्वे मार्ग बदलवला गेला. त्यावेळी संगमनेरचे लोकप्रतिनिधी मूग गळून गप्प बसले. आता मात्र जनआंदोलनाची धग पेटली असून सत्ताधाऱ्यांची मात्र पळापळ सुरू झाली असल्याची टीका रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
चक्काजाम देशाचे लक्ष वेधणार
9 ऑगस्ट क्रांती दिन रविवारी सकाळी 9 वाजता समृद्धी महामार्ग, हिवरगाव पावसा टोल नाका, नारायणगाव बायपास, सिन्नर परिसर, चाळकवाडी, चाकण, खेड, मंचर या विविध ठिकाणी एकाच वेळी चक्काजाम केला जाणार आहे. हजारो नागरिक,महिला,युवक रस्त्यावर उतरणार असल्याने महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार हा रस्ता रोको थांबवण्यासाठी उपाययोजना करत आहे मात्र जंतर – मंतर वरील झेन झी आंदोलनाने आंदोलनाला नवा आयाम दिला असून या चक्काजाम आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.
सोशल मीडियावरील अंधभक्तांना चपराक
नाशिक – पुणे सरळ रेल्वे महामार्गाबाबत काही अंधभक्त महापंडित फक्त सोशल मीडियावर टीकाटिप्पणी करत आहेत. जे कधीही जनसामान्यांच्या उपयोगी पडले नाही. ज्यांनी कधीही समाजकार्यात योगदान दिली नाही. अशी मंडळी मात्र रात्री उशिरा सोशल मीडियावर उद्देश करत आहे. बोलले सोपे काम करणे अवघड या उक्तीप्रमाणे त्यांना मात्र तरुणाईने चांगलेच फैलावर घेतले आहे.



