आपला जिल्हा

सपना मोरे याना ठाकरे गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर

सपना मोरे याना ठाकरे गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर

सपना मोरे याना ठाकरे गटाच्या वतीने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर

कोपरगाव विजय कापसे दि १५ नोव्हेंबर २०२५बहुचर्चित शिवसेना ठाकरे गटाचा कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा तिढा आज अखेर सुटला असून शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या तसेच माजी नगरसेविका सपना भरत मोरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने पक्षात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.

जाहिरात
निवडणूक जाहीर झाल्यापासून कोपरगावचा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे व माजी नगरसेविका सपना भरत मोरे हे दोन्ही गट प्रयत्नशील होते परंतु या लढाईत सपना मोरे या यशस्वी झाल्या असून राजेंद्र झावरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केल्याने पक्षात मोठी फूट तयार झाली आहे.
जाहिरात
 शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सपना भरत मोरे यांना आज शनिवार  दि १५ नोव्हेंबर रोजी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन कोते यांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देत शिवसेनेच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर केले आहे.

जाहिरात
सपना भरत मोरे यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी मिळताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख सुनील शिंदे, जिल्हाप्रमुख सचिन कोते यांच्यासह संपूर्ण शिवसैनिकांचे आभार व्यक्त करत निवडून आल्यानंतर सर्वांनासोबत घेऊन कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार आसल्याचे सांगितले.
तर शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी बोलताना सांगितले की, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना तसेच महाराष्ट्र निर्माण सेनेला सोबत घेऊन कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढत विजयाची पताका फडकवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी बोलताना सांगितले की, कोपरगाव हा शिवसेनेचा नेहमीच बालेकिल्ला राहिला असून नाराज असणाऱ्या शिवसैनिकांची मनधरणी करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांना सोबत घेऊन कोपरगाव नगरपालिकेवर भगवा फडकवणार असल्याचे सांगितले तर युवा सेनेचे शहर प्रमुख पै.गगन हाडा यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करत सपना मोरे यांना शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे