आपला जिल्हा

सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
संगमनेर विजय कापसे दि १७ नोव्हेंबर २०२५- येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संभाजी थोरात कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजाती गौरव दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.

जाहिरात
    कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.विठ्ठल शेवाळे, संस्थेचे संचालक बाबा खरात, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.बी.डी.वाघ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ.एल.डी.घायवट.डॉ.आर. एस.जोरवर, डॉ.राजेश मंजुळ यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले.

जाहिरात

याप्रसंगी सर्व प्राध्यापक, प्राध्यापके तर सेवक राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती समारंभाच्या कार्यक्रमात प्रा.विठ्ठल शेवाळे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या उलगुलान चळवळीचा इतिहास सांगत, ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभ्या राहिलेल्या  या युवा क्रांतिकारकाच्या धैर्याची, धाडसाची प्रशंसा केली. ही भारतीय भूमी मूळ आदिवासी जनजातीची आहे. आदिवासी हे येथील मूलनिवासी आहेत.येथील जंगल संपत्तीवर, खनिज संपत्तीवर, मूलनिवासी आदिवासींचा अधिकार आहे. हे सांगण्यासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी तेथील सावकार, व ब्रिटिश सरकार यांच्याविरुद्ध मोठे आंदोलन केले. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी वयाच्या 22 व्या वर्षी भगवान बिरसा मुंडा यांनी संघर्ष केला, या संघर्षाची प्रेरणादायी वाटचाल मा.विठ्ठल शेवाळे यांनी सांगितली. यावेळी संस्थेचे संचालक मा.प्रा.बाबा खरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याचा व त्यांच्या संघर्षाचा इतिहास सांगितला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.एल.डी.घायवट यांनी केले.

जाहिरात

सूत्रसंचालन प्रा.कोमल मस्के यांनी केली व आभार डॉ.राजेश मंजुळ यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे