आपला जिल्हा

प्रभाग क्रमांक ६ मधील दमदार उमेदवार विक्रमादित्य सातभाई व पद्मावती बागुल 

प्रभाग क्रमांक ६ मधील दमदार उमेदवार विक्रमादित्य सातभाई व पद्मावती बागुल 
प्रभाग क्रमांक ६ मधील दमदार उमेदवार विक्रमादित्य सातभाई व पद्मावती बागुल 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २१ नोव्हेंबर २०२५कोपरगाव तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार स्नेहलता कोल्हे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व मित्रपक्ष आघाडी कडून कोपरगाव नगरपालिकेकरिता नगराध्यक्ष पदासाठी पराग शिवाजी संधान हे उमेदवारी करत आहे तर कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधून माजी नगराध्यक्ष संजय सातभाई व माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई यांचे चिरंजीव विक्रमादित्य संजय सातभाई व माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांच्या पत्नी माजी नगरसेविका पद्मावती योगेश बागुल हे उमेदवारी करत आहे.

जाहिरात

 माजी नगराध्यक्ष संजय सातभाई व माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई तसेच माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागातील बहुतांश विकासात्मक गोष्टी मार्गी लावल्या आहेत तर प्रभागातील सर्वच नागरिकांच्या सुखदुःखात धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून सातभाई व बागुल परिवार सर्व परिचित आहे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत विक्रमादित्य सातभाई व पद्मावती बागुल हे काम करतील असा सर्व मतदारांना विश्वास आहे.

जाहिरात
भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व मित्रपक्ष आघाडीचे प्रभाग ६ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार विक्रमादित्य संजय सातभाई व पद्मावती योगेश बागुल यांनी बोलताना सांगितले की, जनतेने आम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिले तर आम्ही माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांच्या आशीर्वादाखाली संपूर्ण प्रभागाचा कायापालट करणार असल्याचे सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे