डाळिंब चोरास ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद
शेतकऱ्याचा शेतातून केले होते डाळिंब चोरी

कोपरगाव विजय कापसे दि १६ जुलै २०२५– मढी बु शिवारात अर्जुन दिलीप गवळी रा मढी बु ता कोपरगाव या शेतकऱ्याचे डाळींबाचे बागेतून डाळींब चोरुन नेले असल्याची घटना घडली असुन अशी माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना फोन द्वारे मिळताच कोळी यांनी पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे, बीट अंमलदार पोहेकों दहिफळे, पोकों सानप तसेच पोलीस स्टेशनचे पोहेकॉ संदीप बोटे, पोकों अनिस शेख, पोकॉ अमोल फटांगरे, पोकॉ बेनके यांचे सह घटनाठिकाणी जाऊन पाहणी करुन शेतकरी यांचेकडुन मिळालेल्या माहितीचे आधारे तपास सुरु करुन तपास पथकास शहा कारवाडी, कोळगाव माळ भागात पाठवुन आरोपीचा शोध घेतला असता

गौतम विष्णु जगताप वय ४२ रा उजणी ता सिन्नर व गोरख सखाहारी बर्ड वय ३९ रा दहिवडी ता सिन्नर हे दोघेजण त्यांचेकडील मोटार सायकलवर गोण्यामध्ये भरुन काहीतरी घेऊन जात असताना शहा ता सिन्नर परीसरात मिळुन आले असता त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांचेकडे असलेल्या गोण्यामध्ये डाळींब भरल्याचे दिसले त्याचेंकडे विचारपुस केली असता त्यांनी प्रथमतः उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सदरचे डाळींब हे मढी बु शिवारातुन चराचे कडेला असलेल्या डाळींब बागेतुन चोरले असल्याची कबुली दिल्याने सदर दोन्ही इसमांना त्यांचे ताब्यात मिळालेल्या दोन मोटार सायकल व डाळींबाचे गोण्यासह ताब्यात घेतले आहे.






