आपला जिल्हा

अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० % निकाल

अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० % निकाल

अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० % निकाल

जाहिरात

Sangmner vijay kapse दि ८ मे २०२६- :- अमृतवाहिनी शेती शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनियर कॉलेज इयत्ता दहावीच्या निकालाची उत्कृष्ट परंपरा यंदाही कायम आहे. यावर्षी दहावीचा १००% निकाल लागला. अशी माहिती प्राचार्य आशिषकुमार सर यांनी दिली. मार्च २०२६च्या एस एस. सी. परीक्षेस एकूण ११६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी उच्च श्रेणी (Distinction) मध्ये ६० विद्यार्थी, प्रथम श्रेणी ३२, द्वितीय श्रेणी मध्ये २० तर तृतीय श्रेणीमध्ये ०४ इ. विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

जाहिरात

प्रथम क्रमांक संचिता नवनाथ वलवे (९३.८०%), द्वितीय क्रमांक पृथा सोमनाथ घुले (९३.४०%), तृतीय क्रमांक अम्रिता रामवीरसिंग कुशवाह (९३.००%) चतुर्थ क्रमांक ईश्वरी प्रमोद विखे (९२.४०) पंचम क्रमांक रूद्र निलेश अनाप (९१.६०%) अशी विदयालयातील सुयश मिळविणा-या विद्यार्थ्यांचे नावे आहेत. ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणारे एकुण १२ विद्यार्थी आहेत.

जाहिरात

सदर विद्यार्थ्याचे अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री मा.नामदार बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे उपाध्यक्ष बाळासाहेब गुंजाळ पाटील, माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ. शरयू देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे व्यवस्थापक प्राचार्य व्ही. बी. धुमाळ, डायरेक्टर अकॅडेमिक डॉ जे. बी. गुरव, प्राचार्य आशिष कुमार व सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे