संगमनेर विजय कापसे दि २७ डिसेंबर २०२४– काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयातील अधिकारी शिवाजीराव आरगडे यांच्या मातोश्री विठाबाई दत्तू आरगडे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे.जाहिरात अमृत
गोल्डन सिटी आरगडे मळ्यातील रहिवासी असलेल्या स्वर्गीय विठाबाई दत्तू आरगडे या धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. आरगडे मळ्यामध्ये त्यांनी सर्वांना आईच्या प्रेमाने जिव्हाळ्याची वागणूक दिली. हाच समाजसेवेचा वारसा घेऊन शिवाजी आरगडे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयात गेली 25 वर्षापासून सेवा देत आहेत.
जाहिरात
त्यांच्या पश्चात मुलगा शिवाजी तर दोन मुली सून, नातू, असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने आरगडे मळा व परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
जाहिरात
त्यांच्या निधनाबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, डॉ.जयश्रीताई थोरात, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, यशोधन कार्यालयातील कर्मचारी आदींसह विविध मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे.