आपला जिल्हा

कोपरगाव शहराचे पाणी संकट मुख्यमंत्र्यांकडे मंटाला यांची चौकशीची मागणी

कोपरगाव शहराचे पाणी संकट मुख्यमंत्र्यांकडे मंटाला यांची चौकशीची मागणी

कोपरगाव शहराचे पाणी संकट मुख्यमंत्र्यांकडे मंटाला यांची चौकशीची मागणी

कोपरगाव पाणी योजनेची तातडीने चौकशी करा,मुख्यमंत्र्यांकडे राजेश मंटाला यांची मागणी

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २५ नोव्हेंबर २०२५-कोपरगांव शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्यासाठी मंजूर करण्यात आलेली ₹१३१.२४ कोटींची महत्त्वाकांक्षी पाणीयोजना २४ महिन्यांत पूर्ण व्हायची होती. जर एवढा निधी वापरला गेला तर या योजनेच्या माध्यमातून शहराला दररोज पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. मात्र, कामास सुरुवात होऊन तब्बल ४१ महिने उलटूनही आजपर्यंत प्रकल्प अपूर्ण अवस्थेतच आहे आणि नागरिकांना अद्याप एक थेंबही पाणी मिळालेले नाही, ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.

जाहिरात

याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना संपूर्ण पाणीपुरवठा योजनेतील झालेल्या विलंब, अनियमितता व निकृष्ट कामाबाबत सविस्तर निवेदन सादर केले. मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन स्विकारून त्वरित चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून प्रकल्पातील प्रत्येक घटक तपासून जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

विशेष म्हणजे, योजनेत जुने चारही तलाव दुरुस्त करण्यासाठी तब्बल ₹२० कोटींचा निधी समाविष्ट असतानाही त्या कामांचा ठोस प्रारंभ झालेला नाही. शिवाय पाइपलाइन, फिल्टर हाऊस, जलकुंभ, वितरण जाळे यांसह अनेक महत्त्वाची कामे रखडलेली आहेत. वेळेवर ही सर्व कामे केली नाही याउलट निधी कुठे गेला याचा शोध घेण्याची गरज आहे.

राजेश मंटाला यांनी सांगितले की, “नागरिकांवर पाणीटंचाईची तीव्र भावना ओढवलेली आहे. जनतेच्या करारातून मिळणारा निधी कसा वापरला गेला आहे याचे काहीही ताळेबंद नाही.प्रकल्प अर्धवट ठेवणे हे जनतेच्या विश्वासाशी केलेले विश्वासघात आहे. योजनेतील प्रत्येक पैशाचा हिशोब जनतेसमोर यायलाच हवा.

दरम्यान, त्यांनी शासनाकडून तातडीने चौकशी करून कामाचा वेग वाढवावा, ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवावी आणि कोपरगाव शहराला त्वरित नियमित पाणीपुरवठा सुरू व्हावा, अशी ठाम मागणी केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे