आपला जिल्हा

संगमनेर सेवा समितीचे व्हिजन शहराला पुढे घेऊन जाणारे – खा.भाऊसाहेब वाकचौरे

संगमनेर सेवा समितीचे व्हिजन शहराला पुढे घेऊन जाणारे – खा.भाऊसाहेब वाकचौरे

माजीमंत्री बाळासाहेब थोरात हे विकासाचे आर्किटेक

लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सर्व चांगले उमेदवार

जाहिरात

संगमनेर  प्रतिनिधी दि २७ नोव्हेंबर २०२५- माजीमंत्री बाळासाहेब थोरात हे चांगले आर्किटेक्ट असून त्यांनी संगमनेर शहर ही विकसित बनवले आहे. या शहरांमध्ये आज काही कमी नाही. शांतता सुव्यवस्था आणि बंधुभाव हा इतरांसाठी अनुकरणीय आहे मात्र मागील एक वर्षापासून संगमनेर शहर व तालुका अस्वस्थ झाला असून हे सर्व थांबवण्यासाठी संगमनेर सेवा समितीचे उमेदवार व्हिजन संगमनेर 2.0 मधून शहराला पुढे नेतील असा विश्वास खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात

जयहिंद सर्कल मालदाड रोड येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजीमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे,उमेदवार दिलीपराव पुंड, भारत बोऱ्हाडे,सीमा खटाटे,सौ.अर्चना दिघे,किशोर पवार, सौरभ कासार,शोभा पवार,प्राची काशीद आदी उपस्थित होते.

जाहिरात

यावेळी बोलताना खासदार वाकचौरे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर शहराला राज्यात नव्हे तर देशाला ओळख मिळून दिली आहे. हे शहर विकासाचे शहर आहे. येथे सर्वजण आनंदाने एकत्र आहेत. पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था आहे. मोठ मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. येथील बसस्थानक पाहण्यासाठी नागरिक बाहेरून येत आहेत. या शहराला जपण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. संगमनेर तालुक्यातील जनतेच्या मनात एक खंत आहे वर्षापूर्वीचा निकाल चुकीचा लागला आहे आता सर्वांना एकत्र येऊन पुन्हा शहराच्या विकासासाठी काम करायचे असल्याने सर्वांनी संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.

तर माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, इच्छुकांची मोठी संख्या होती मात्र अनेकांना थांबावे लागले शहराच्या विकासासाठी आपल्याला एकत्र राहायचे आहे. ही संस्कृती परंपरा जपायची आहे. जातीभेद करणारे खूप येतील मनभेद करतील मात्र आता त्यांच्या कोणत्याही भुलथापांना बळी पाडायचे नाही. मागील एक वर्षांमध्ये शहर अस्वस्थ झाले आहे. शहरातील प्रत्येक माणूस अस्वस्थ आहे ही थांबवण्याची जबाबदारी या निवडणुकीतून असून सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, नागरिकांच्या सूचनांचा आदर करून संगमनेर सेवा समिती काम करणार आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा राज्यभरात इतका चांगला संपर्क आहे त्यामुळे निधीमध्ये कुठेही कमी पडणार नाही. या शहरासाठी कायम आपण निधी आणला आहे यापुढील काळात राज्याला हेवा वाटावा असे संगमनेर शहर आपण करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी सर्व उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त केली. या सभेसाठी संगमनेर शहरातील युवक महिला व नागरिकांची मोठी गर्दी होती युवकांनी काढलेल्या रॅलीमुळे संगमनेर मध्ये संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांचे जोरदार स्वागत झाले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे