आपला जिल्हा

जय महाकाल मित्र मंडळाच्या वतीने हनुमान जयंती निमित्त महाप्रसादाचे वाटप

जय महाकाल मित्र मंडळ व कोपरगाव युवा सेनेच्या वतीने हनुमान जयंती निमित्त महाप्रसादाचे वाटप

जय महाकाल मित्र मंडळ व कोपरगाव युवा सेनेच्या वतीने हनुमान जयंती निमित्त महाप्रसादाचे वाटप

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १३ एप्रिल २०२५नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या कोपरगाव शहरातील जय महाकाल मित्र मंडळ व कोपरगाव युवा सेनेच्या वतीने शनिवार दि १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त युवकांनी एकत्र येत शहरातील हनुमंत व्यायामशाळेत हनुमान चालीसा पठन करत उपस्थित भाविक भक्तांना गोड लापशी व मसाला चना महाप्रसाद म्हणून वाटप करत मोठ्या उत्साहात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

जाहिरात

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कोपरगाव शिवसेना युवा सेनाप्रमुख पै. गगनभैय्या हाडा, मुन्नाभाई मंसूरी, काना हाडा, वैभव शेलार, विनय टाक, पियुष सैंदाणे,पवन हाडा, राहुल गुडेकर,निखिल कंकाळे, दगु गुडघे,दीपक वाघमारे, साहिल पटवेकर, समीर पटवेकर,राहुल हाडा, चेतन हाडा, गौतम निंदाने, मुकेश वाणी, सागर हाडा, सोनू निर्भवणे, याकुब शेख, चेतन पवार, संदीप हाडा, विनीत हाडा, बाबू हाडा आदी सह मोठया संख्येने जय महाकाल मित्र मंडळाचे सदस्य तथा कोपरगाव शहरातील युवासैनिक उपस्थित होते.

जाहिरात

याप्रसंगी जय महाकाल मित्र मंडळाचे सर्वेसर्वां तथा युवासेना शहर प्रमुख गगन हाडा यांनी बोलताना सांगितले की, आजच्या युवा पिढीला आपल्या रूढी, परंपरा, संस्कृती, चालीरीती सण उत्सवाचे महत्व कळावे म्हणून आम्ही सर्व जय महाकाल मित्र मंडळाचे सदस्य तथा युवा सैनिक एकत्र येत सर्व सण उत्सव, थोर संत,महंत, महापुरुषांचे जयंती पुण्यतिथी वेगवेगळे सार्वजनिक सामाजिक प्रबोधनात्मक उपक्रम घेत साजरे करत असतो त्यातूनच श्रीबहनुमंत रायांचा जयंती उत्सव साजरा करत समाजापुढे एक आदर्शवत उपक्रम राबविल्याचे उदाहरण दिले असल्याचे सांगत सर्वाना हनुमंत जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे