आपला जिल्हा

शिवसेना मेळाव्यास कोपरगावच्या शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना मेळाव्यास कोपरगावच्या शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेना मेळाव्यास कोपरगावच्या शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ४ जुन २०२६शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा मंगळवार २ जून रोजी शिर्डी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला कोपरगाव तालुक्यासह शहरातील शिवसेनिकांची उत्स्फूर्तपणे उपस्थिती पहावयास मिळाली.

जाहिरात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यास माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित शिवसेनिकांना मार्गदर्शन केले तरी याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष अस्लम शेख, समन्वयक मुन्ना मन्सूरी तर   शिवसेनेचे कोपरगाव शहर प्रमुख गगन हाडा यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिक निखिल कंक्राळे, ऋषी खैरनार, कान्हा हाडा, वैभव शेलार, विनय टाक, दिनेश मरसाळे, समीर पटवेकर, स्वप्निल निरभवणे, पियुष सैंदाणे, समीर आत्तार, आबासाहेब पवार, ओम पवार, दीपक सरोदे, शहाबाज शेख, सोहेल पठाण, वरून टाक, संदीप हाडा, आकाश चावरे आदी शहरातील शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.

जाहिरात
 याप्रसंगी शहर प्रमुख गगन हाडा यांनी खासदार संजय राऊत यांच्या सोबत चर्चा करताना सांगितले की,आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन कोपरगाव शहरातील संघटन बळकट करण्यावर भर देणार असून शहरातील प्रत्येक विभागात शिवसेनेची शाखा सुरू करणार असल्याचे सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करत विविध सामाजिक उपक्रम राबवत राहणार.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे