आपला जिल्हा

एकनाथ शिंदे यांच्या फोन स्टाईलची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काढली हवा

एकनाथ शिंदे यांच्या फोन स्टाईलची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काढली हवा

नद्या मंजूर,डोंगर मंजूर,जिथे जातील तिथे एमआयडीसी मंजूर करतात

महायुतीचे लोक फक्त बनवाबनवी करतात

जाहिरात

संगमनेर प्रतिनिधी दि २९ नोव्हेंबर २०२५उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेर मध्ये येऊन उद्योग मंत्री व आरोग्य मंत्री यांना फोन लावला. नगरपरिषद निवडणुकीमध्ये ते विविध ठिकाणी प्रचारासाठी गेल्यानंतर हेच करतात याचे प्रात्यक्षिक महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जनतेसमोर उघडच केले. पांढरकवडा येथील सभेतही लावलेले फोन त्यांनी विराट सभेत ऐकवले आणि एकनाथ शिंदे यांच्या फोन स्टाईलची हवाच काढली.

जाहिरात

संगमनेर सेवा समितीच्या वतीने झालेल्या विराट सभेत महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदे यांनी पांढरकवडा येथील सभेमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांना लावलेला फोन आणि संगमनेर मधील लावलेल्या फोन जन समुदायाला ऐकावला. यावेळी व्यासपीठावर मा.आ.डॉ.सुधीर तांबे,आमदार सत्यजित तांबे,सौ.दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात यांच्यासह सेवा समितीचे सर्व उमेदवार व विविध पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

या सभेमध्ये माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकार व त्यांनी राबवलेले निर्णय याचबरोबर संगमनेरमध्ये मागील एक वर्षापासून निर्माण झालेले अस्वस्थ वातावरण, ड्रग्ज आणि अमली पदार्थांची तस्करी याबाबत चिंता व्यक्त केली. याचबरोबर नवीन लोकप्रतिनिधी यांना फक्त टोल वसुलीसाठी वेळ मिळत असून विकास कामांना त्यांना वेळ मिळत नाही असा टोला लगावला तर पालकमंत्री यांनी पहिला नगर – मनमाड गजक्यांचा रस्ता पूर्ण करावा आणि मग संगमनेर मध्ये यावे असे सांगितले.

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या सगळीकडे डोंगर मंजूर, नद्या मंजूर, धरण मंजूर हा धडाका लावला आहे. निवडणुकीसाठी महायुतीचे लोक वेगवेगळे फंडे वापरतात. बनवाबनवी चा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे अशी टीका त्यांनी केली. याचबरोबर आण तो फोन म्हणत एकनाथ शिंदे यांचे संगमनेर व यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील एकनाथ शिंदे यांचे फोनवरील संभाषण विराट सभेत ऐकवले. आणि एकनाथ शिंदे यांच्या फोन स्टाईलची हवाच काढली.

संगमनेर सेवा समितीच्या वतीने संगमनेर मध्ये विराट सभा झाली. विविध ठिकाणी सर्वांसाठी परवानगी मागितल्या मात्र परवानग्या दिल्या नाही त्यामुळे रोडवर सभा घ्यावा लागली असे आमदार सत्यजित यांनी सांगितले तर यापुढील काळामध्ये संगमनेर मध्ये एकही अनाधिकृत फ्लेक्स आणि कोणाचीही सभा रोडवर होणार नाही असे आश्वासन दिले. याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या जवळ उभा राहून कानामध्ये सांगणाऱ्यापेक्षा आमचा वशिला लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मोठा असल्याची टीका त्यांनी संगमनेरचे लोकप्रतिनिधी अमोल खताळ यांच्यावर केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी घोटाळ्यांचा कडकडाट केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे