श्री. छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय सुरेगाव वाणिज्य शाखेत मार्गदर्शन वर्ग संपन्न
श्री. छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय सुरेगाव वाणिज्य शाखेत मार्गदर्शन वर्ग संपन्न
श्री. छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय सुरेगाव वाणिज्य शाखेत मार्गदर्शन वर्ग संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि ६ डिसेंबर २०२५– छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय सुरेगाव, कोळपेवाडी येथे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावृद्धीसाठी व भविष्यातील वाणिज्य शाखेची आवश्यकता पहाता विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. या मार्गदर्शन वर्गात Book-Keeping & Accountancy या विषयावर प्रा. श्रीमती पवार एस.डी. मॅडम, शारदा ज्युनियर कॉलेज राहाता यांनी उत्कृष्ट व उपयुक्त मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना लेखाशास्त्रातील विविध घडामोडी, बोर्ड परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे घटक तसेच गुण मिळवण्याच्या सोप्या तंत्रांची माहिती प्रभावीपणे दिली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रश्नोत्तरांद्वारे आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. प्राचार्य चौरे पी. बी. सर यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीत उपमुख्याध्यापक माने सर , पर्यवेक्षक झावरे सर, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख घोटेकर सर, आगवन ए.पी. सर , बाबासाहेब पवार सर, राहुल गमे सर, दत्तात्रय मोरे सर, प्रशांत त्रिभुवन सर, बोर्डे सर श्रीम.जाधव मॅडम, श्रीम. खताळ मॅडम, श्रीम. रामटेके मॅडम व इतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक बाबासाहेब आभाळे सर, यांनी करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या प्रसंगी प्राचार्यांनी मार्गदर्शक प्राध्यापकांचे मनःपूर्वक आभार मानत सांगितले की अशा दर्जेदार मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच उंचावेल. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वाणिज्य शाखेतील तुषार बोरसे सर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महाविद्यालयात अशा उपक्रमांचे आयोजन पुढील काळातही करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.



