आपला जिल्हा

डॉ सी एम मेहता कन्या विद्यालयात AI लॅबचे उद्घाटन

डॉ सी एम मेहता कन्या विद्यालयात AI लॅबचे उद्घाटन

डॉ सी एम मेहता कन्या विद्यालयात AI लॅबचे उद्घाटन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑगस्ट २०२५कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ.सी एम.मेहता कन्या विद्यालयात नुकतेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI ) हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी अद्ययावत प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या अभ्यासक्रमाची माहिती व्हावी म्हणून रयत शिक्षण संस्थेने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांत इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गांसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता हा अभ्यासक्रम सुरु केला असून, डॉ.सी.एम मेहता कन्या विद्यालयात हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी आद्ययावत अशी प्रयोगशाळा तयार करण्यात आली असून.

जाहिरात

या प्रयोगशाळेचे उद्घाटन स्थानिक शालेय समितीच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कृत्रिम बुद्धिमत्ता विषयातील तज्ञ  आदित्य गायकवाड ,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य  पद्मकांत कुदळे, स्थानिक स्कूल व सल्लागार समितीचे सदस्य धरमशेठ बागरेचा ,सुशीलकुमार अरोरा , बाळासाहेब नरोडे ,विद्यालयाच्या प्राचार्या अनिता धनक उपमुख्याध्यापिका उज्वला म्हस्के , विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रभाकर आभाळे व पर्यवेक्षिका सुनीता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

जाहिरात

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना पुष्पाताई काळे यांनी विद्यार्थिनींना प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच भारतीय मूल्यांची जोपासना करा आणि खूप शिकून मोठे होताना शाळेला, समाजाला आणि आई-वडिलांना विसरू नका, त्यांची काळजी घ्या असे मार्गदर्शन केले. AI च्या माध्यमातून प्रगती करताना रोबोटचा योग्य वापर करा असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला.

जाहिरात

कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ  आदित्य गायकवाड यांनी आपल्या भाषणातून कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाची सुरूवात सन १९५६ साली झालेली असून त्याच्या आज पर्यंतच्या प्रगतीचा आढावा आपल्या भाषणातून घेतला. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामध्ये आपल्याला उत्तम करिअर करण्याची संधी आहे त्यामुळे प्रत्येकाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय ,अभियांत्रिकी व इतर विविध क्षेत्रांमध्ये कसे बदल झालेले आहेत याचा आढावा त्यांनी आपल्या भाषणातून घेतला.कृत्रिम तंत्रज्ञानाचे समाजाला होणारे फायदे आणि तोटे हे त्यांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितले.
सर्व उपस्थित मान्यवरांनी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळेचे निरीक्षण करून उपक्रमाचे कौतुक केले. विद्यालयाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम या विभागाचे प्रमुख वेणुगोपाल अकलोड, उपविभाग प्रमुख  प्रशांत घोटकर , सुनिता वाबळे ,  ताकवले पी. एस , सौ पाटील , सतिष मेंढे,भाऊ बडे , श्रीम.पवार, श्री शेख खालकर सर विद्यालयातील सर्व सेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक ललित जगताप व आभार प्रशांत घोटकर यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे