जिजाऊ महाविद्यालयाचा जिल्ह्यात डंका

जिजाऊ महाविद्यालयाचा जिल्ह्यात डंका
जिजाऊ महाविद्यालयाचा जिल्ह्यात डंका
कोपरगाव विजय कापसे दि १२ डिसेंबर २०२५–सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अहिल्यानगर जिल्हा क्रीडा विभाग व बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये कर्जत तालुक्यातील राशीन येथील जिजाई चॅरिटेबल ट्रस्ट संचलित जिजाऊ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील बीएससी द्वितीय वर्षांमध्ये शिकणाऱ्या केशव भंडारे या विद्यार्थ्याने ७० किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची विभागीय पातळीवर त्यांची निवड झाली आहे .
त्यास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव शिंदे , सचिव क्रिश शिंदे , जिजाई महाविद्यालयाचे प्राचार्य अमृत पांडुळे , शारीरिक शिक्षण संचालक मार्गदर्शक किशोर पवार यांचे मार्गदर्शन लाभले . केशव भंडारे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचेसंस्थेच्या वतीने तसेच कॉलेजच्या वतीने संस्थापक अध्यक्ष केशव शिंदे व सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आहे . राशीन येथील जिजाऊ महाविद्यालयाच्या वतीने कॉलेज मध्ये विविध उपक्रम राबविले जातात .




