आपला जिल्हा

बिबट्या हल्ला प्रकरणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा वनमंत्र्यांना फोन

बिबट्या हल्ला प्रकरणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा वनमंत्र्यांना फोन

वन विभागाकडून जवळे कडलग येथील बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

बिबट्यांपासून रक्षण करण्याकरता शासनाने प्रभावी उपाययोजना करावी – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर प्रतिनिधी दि १४ डिसेंबर २०२५–  जवळे कडलग येथील चिमुकल्या सिद्धेश सुरज कडलग याच्यावर बिबट्याने हल्ला करून त्याचा जीव घेतला. यानंतर जवळे कडलग ग्रामस्थ व संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तातडीने वनमंत्री गणेश नाईक यांना फोन लावून याबाबत प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली यावर वन विभागाकडून सदर बिबट्याला ठार मारण्याचे आदेश निघाले असून बिबट्यांपासून माणसांना संरक्षण मिळण्याकरता शासनाकडून प्रभावी उपाययोजना झाली पाहिजे अशी आग्रही मागणी मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

जाहिरात

अंगणामध्ये खेळत असताना चार वर्षाचा सिद्धेश सुरज कडलग याच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला आणि यामध्ये चिमुकल्या सिद्धेशचा जीव गेला यानंतर जवळेकडलग येथील ग्रामस्थ व नातेवाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला. याचबरोबर संगमनेर तालुक्यामध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झाली. सर्व ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालय व पोलीस स्टेशनवर धाव घेऊन तीव्र निषेध व्यक्त केला. या ठिकाणी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनीही उपस्थित राहून तीव्र घटनेचा संताप व्यक्त केला याचबरोबर वन विभागाने बिबट्यांबाबत कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली.

जाहिरात

ही घटना समजतात महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना फोन लावून सदर घटनेची माहिती दिली. याचबरोबर संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढली असून यावर तातडीने प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी केली. याचबरोबर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली. वनमंत्री गणेश नाईक यांच्या चर्चेनंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी वर विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याशी चर्चा केली.

जाहिरात

यानंतर वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या डॉ.जयश्रीताई थोरात यांच्याशी फोनवरून चर्चा केली. याचबरोबर ग्रामीण पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्यासोबतही चर्चा केली.

या घटनेनंतर वन विभागाने तातडीने मध्यरात्री जवळे कडलग येथील बिबट्याला मारण्याचे आदेश दिले असून संगमनेर तालुक्यासह सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या सर्व गावांमध्ये वाढलेल्या बिबट्याच्या संख्यांवर नियंत्रण करण्यासाठी वन विभागाकडून ठोस उपाय योजना राबविण्याची आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे