आपला जिल्हा

व्यसन, न्यूनगंड ते आत्मविश्वास – महेश पाडेकर यांचे किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन

व्यसन, न्यूनगंड ते आत्मविश्वास – महेश पाडेकर यांचे किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन

व्यसन, न्यूनगंड ते आत्मविश्वास – महेश पाडेकर यांचे किशोरवयीन मुलांना मार्गदर्शन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १७ डिसेंबर २०२५भंडारदरा डॅम, शेंडी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात मानसशास्त्र विषयाचे अभ्यासक व अनुभवी समुपदेशक महेश पाडेकर यांनी “किशोरवयीन मुलांच्या समस्या व उपाययोजना” या विषयावर प्रभावी व मार्गदर्शक व्याख्यान दिले.

जाहिरात

किशोरवयात निर्माण होणारे मानसिक गोंधळ, न्यूनगंड, व्यसनांचे आकर्षण, मोबाईलचे व्यसन, अभ्यासातील उदासीनता, पालक–विद्यार्थी संवादातील दरी, आत्मविश्वासाचा अभाव अशा अनेक वास्तव समस्यांचा त्यांनी सखोल आणि उदाहरणांसह उलगडा केला. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत, अनुभवकथन व कृतीयुक्त उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी आत्मसन्मान, सकारात्मक विचारसरणी आणि योग्य निर्णयक्षमता कशी विकसित करावी याचे प्रभावी मार्गदर्शन केले.

जाहिरात

“किशोरवय हा आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्पा असून योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी घडतो, अन्यथा तो भरकटतो,” असे स्पष्ट मत महेश पाडेकर यांनी व्यक्त केले. व्यसनांपासून दूर राहण्यासाठी आत्मनियंत्रण, ध्येय निश्चिती आणि शिक्षक-पालकांचा संवाद किती आवश्यक आहे, हे त्यांनी ठळकपणे अधोरेखित केले.

जाहिरात

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य दिलीप रोंगटे हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी अशा मार्गदर्शक व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा मिळते, असे मत व्यक्त केले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी संदीप महाडदेव व सहकार्यक्रमाधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी शिबिराच्या उद्दिष्टांची माहिती देत विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा जीवनात उपयोग करावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदने या विद्यार्थिनीने प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन खाडे या विद्यार्थ्याने केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, समाजभान व सकारात्मक जीवनदृष्टी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उपस्थित शिक्षक व स्वयंसेवकांनी व्यक्त केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे