आपला जिल्हा

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून तालुक्यात अद्यावत ९ अभ्यासिका – डॉ.जयश्रीताई थोरात

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून तालुक्यात अद्यावत ९ अभ्यासिका – डॉ.जयश्रीताई थोरात

राजापूर येथे अभ्यासिकेचे भूमिपूजन

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि १९ डिसेंबर २०२५यशवंतराव चव्हाण यांची समृद्ध वारसदार अशी ओळख असलेली लोकनेते तथा मा.शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सहकार, शेती,शिक्षण,ग्रामीण अर्थव्यवस्था, दूध व्यवसाय या सर्व क्षेत्रातून संगमनेर तालुका हा राज्यासाठी आदर्शवत मॉडेल बनवला आहे. याचबरोबर तालुक्यातील युवकांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. वाचन चळवळ समृद्ध होण्याबरोबर तरुणांना अभ्यासासाठी मदत होण्याकरता 9 अद्यावत अभ्यासिका होणार असून ही राज्यातील आदर्शवत संकल्पना असल्याचे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.

जाहिरात

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून राजापूर येथे ग्रामविकास 2515 अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने 30 लाख रुपये निधीतून होणाऱ्या अद्यावत अभ्यासिकेच्या भूमिपूजन प्रसंगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी समवेत रामहरी कातोरे. संतोष हासे, माधव हासे, सौ.लतिका गायकर, कुसुमताई पानसरे, बाबासाहेब गायकर,  सोमनाथ हासे, संजय हासे,प्रदीप हासे, अजय हासे, रावसाहेब खतोडे, राजेंद्र खैरनार, विनीत खतोडे,रमेश जाधव, शैला हासे, राजश्री घोलप, जयश्री हासे, मनीषा हासे, देवराम हासे, आनंदा हासे , प्रशांत तिकांडे, बाळासाहेब बर्डे, भास्कर मोहिते, अविनाश शेलकर, भारत हासे, सुशांत हासे, राहुल गायकर, संभाजी हासे, विकास हासे, अमोल साळुंके,  आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

याप्रसंगी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर हे अद्यावत शिक्षणाचे केंद्र झाले आहे. तालुक्यामध्ये विविध भागांमध्ये अद्यावत अभ्यासिका उभारून विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी महत्त्वाच्या सुविधा करण्याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 9 अभ्यासिकांची संकल्पना राबवली आहे. तालुक्यातील नऊ गावांमध्ये या अभ्यासिकांचे काम सुरू करण्यात येणार आहे. राजापूर येथून संगमनेर येथे येणारे अनेक विद्यार्थी असून येथे झालेल्या अद्यावत अभ्यासिकेमुळे या सर्व विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. याचबरोबर स्पर्धा परीक्षांसह शैक्षणिक क्षेत्रातील सर्व परीक्षांकरिता युवक व युवतींना या अभ्यासिकेची मोठी मदत होणार आहे. संगमनेर तालुक्यात राबवले जाणारे हे पहिलेच मॉडेल असून यामुळे युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

तर रामहरी कातोरे म्हणाले की, शिक्षणातून समृद्धी येत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेकरता अनेक सुविधा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी निर्माण केले आहेत याचबरोबर डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून यशोधन कार्यालय येथे सुद्धा अद्यावत लायब्ररी सुरू असून अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांनी या लायब्ररीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी संतोष हासे,बाबासाहेब गायकर यांनीही आपली मनोगती व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप हासे यांनी केले तर रावसाहेब खतोडे यांनी आभार मानले. यावेळी राजापूर सह परिसरातील नागरिक महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे