मा.मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून रायतेवाडी फाटा उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

मा.मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून रायतेवाडी फाटा उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे
नाशिक – पुणे महामार्गाचे काँक्रिटीकरण

Sangmner vijay kapse दि २१ मे २०२६– महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सततच्या विकास कामांमधून वैभवशील ठरलेल्या संगमनेर तालुक्याच्या विकासाला गती देणारा नाशिक – पुणे महामार्गाचे काँक्रिटीकरण पूर्णत्वात येत असून रायतेवाडी फाटावरील उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 2013 मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री सी.पी.जोशी यांच्याकडे पाठपुरावा करून विना टोल 9 किलोमीटर लांबीचा बायपास मंजूर करून घेतला. यानंतर सातत्याने विविध रस्त्यांच्या कामाबरोबर नाशिक – पुणे या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करून घेतले. आता नाशिक – पुणे रस्त्याचे पूर्ण कॉंक्रिटीकरण होत असून संगमनेर तालुक्यातील काम पूर्णत्वास आले आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. पावसाळ्यामध्ये तर चंदनापुरी घाट व परिसर हा प्रवासी व पर्यटकांसाठी आनंद देणारा ठरत आहे.

याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बसस्थानक हा लक्ष्मी रोड चौपदरीकरण, पादचारी मार्ग सह डिव्हायडर अत्यंत गुणवत्तेचा झाला असून संगमनेरच्या वैभवात भर टाकणारा ठरला आहे. याचबरोबर संगमनेर खुर्द प्रवरानदी ते रायतेवाडी फाटा या रस्त्याचे विद्युतीकरण पूर्ण केले आहे.
वाढत्या वाहतुकीमुळे नाशिक – पुणे महामार्गावरील इंजिनिअरिंग कॉलेज जवळील स्टेटस हॉटेल समोर व रायते फाटा येथे अपघातांचे प्रमाण वाढल्याने या दोन्ही ठिकाणी उड्डाणपुलासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे 7 फेब्रुवारी 2022 रोजी पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामधून इंजीनियरिंग कॉलेज जवळील उड्डाणपूल पूर्ण झाला असून वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

तर रायतेवाडी फाटा येथे असलेल्या संगमनेरकडे येणाऱ्या रस्त्यासाठी उड्डाणपूल अत्यंत गरजेचा होता याकरता मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे व संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याने हे कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे तालुक्याच्या दक्षिण भागातील व पठार भागातील नागरिकांना महामार्ग पार करण्यासाठी सोयीचे होणार आहे याचबरोबर या ठिकाणी होणाऱ्या दुर्घटना टळणार आहेत. हे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही दिवसात या पुलाचे काम पूर्णत्वास येणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रायतेवाडी उड्डाणपुलासाठी 2022 मध्ये मंजुरी
रायतेवाडी सह दक्षिण भागातील व पठार भागातील विविध नागरिकांनी रायतेवाडी फाटा येथे उड्डाणपुलाची मागणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. 2022 मध्ये या कामाला त्यांनी मंजुरी मिळून दिली याचबरोबर सातत्याने या उड्डाणपुलासाठी पाठपुरावा केला. उड्डाणपूलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असल्याने नागरिकांना हायवे पार करण्यासाठी अत्यंत सोयीचे होणार आहे. यामुळे या कामासाठी पाठपुरावा करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे आम्ही आभारी आहोत.
संतोष मांडेकर ( रायतेवाडी फाटा )



