नगरपालिकेच्या वतीने महिला बचतगट दिवाळी साहित्य विक्री केंद्राचा शुभारंभ
नगरपालिकेच्या वतीने महिला बचतगट दिवाळी साहित्य विक्री केंद्राचा शुभारंभ
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि १६ ऑक्टोबर २०२५– महिलां बचतगटांनी दिवाळीत लागणारे घरगुती स्वनिर्मित साहीत्य विक्री करण्यासाठी आवश्यक ती बाजारपेठ मिळावी या उद्देशाने कोपरगाव नगरपरिषद मार्फत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कोपरगाव शहरात या बचतगटातील माहिलांना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या विक्री स्टॉलचा शुभारंभ बुधवार दि १५ रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांच्या हस्ते झाला.
जाहिरात
या प्रसंगी जगताप यांनी बोलताना सांगितले की, या योजनेतील महत्वाचा घटक म्हणजे शहरातील दुर्बल घटकातील कुटुंबातील महिलांना एकत्र करून बचतगट बांधणी करणे,त्या बचत गटाचे राष्ट्रीय कृत बँकेत खाते सुरु करणे,स्थापित महिला बचत गटांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देणे, तसेच बचतगटांना बँकेमार्फत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे यासारख्या विविध उपक्रमाची अंमलबजावणी शहर अभियान व्यवस्थापन कक्षाकडून यशस्वीपणे केली जात आहे. त्यातीलच हा एक महत्वाचा उपक्रम असून महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला उत्कृष्ठ बाजारपेठ मिळावी जेणेकरून गटातील महिलांना सबलीकरणासाठी हातभार लागू शकेलजाहिरात
या उद्देशाने कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान याठिकाणी तीन विक्री केंद्र कोपरगाव नगरपरिषद मार्फत उभारून दिले आहे. या विक्री केंद्रावर दिवाळी फराळ, मातीच्या लक्ष्मी मूर्ती,पणत्या,पूजेचे साहित्य, आकाश कंदील,लक्ष्मी पादुका,तोरण यासारख्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहे तरी जास्तीत नागरिकांनी या महिला बचतगटांनी स्वनिर्मित तयार केलेल्या साहित्याची खरेदी करत महिला सबलीकरणासाठी आपला हातभार लावावा असे आवाहन मुख्याधिकारी जगताप यांनी केले आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला बचत गटाच्या समृद्धी शहर स्तर संघाच्या व्यवस्थापक हर्षा बाळकृष्ण पाटील,समुदाय संसाधन व्यक्ती हेमा तवरेज, शहर अभियान व्यवस्थापन व्यवस्थापक रामनाथ जाधव यांनी अथक परिश्रम घेतले तर या ठिकाणी संस्कृती महिला बचतगट, बालकृष्ण महिला बचतगट व साई श्रध्दा महिला बचतगट यांनी स्टॉल विक्री केंद्र सुरू केले आहे.