आपला जिल्हा

विवेक कोल्हे व नगराध्यक्ष संधान यांच्या आवाहनाला कोपरगावकरांचा प्रतिसाद; स्वच्छता मोहीम राबवत शहरवासीयांना दिला विश्वास

 विवेक कोल्हे व नगराध्यक्ष संधान यांच्या आवाहनाला कोपरगावकरांचा प्रतिसाद; स्वच्छता मोहीम राबवत शहरवासीयांना दिला विश्वास
विवेक कोल्हे व नगराध्यक्ष संधान यांच्या आवाहनाला कोपरगावकरांचा प्रतिसाद; स्वच्छता मोहीम राबवत शहरवासीयांना दिला विश्वास
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २५ डिसेंबर २०२५युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या व्हिजनरी नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पराग संधान यांच्या मार्गदर्शनाने नगरपालिकेचे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून, कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक संपन्न होताच विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील विविध प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेला समस्त कोपरगावकरांनी चांगला प्रतिसाद देत उपक्रमाचे स्वागत केले आहे.

जाहिरात
नगरपालिका निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या उद्देशाने युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग संधान यांनी कोपरगाव शहरातील विविध प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून आदर्शवत नेतृत्व असल्याचे सिद्ध केले असून, प्रशासनाला सोबत घेऊन त्यांनी जोमाने कामाला सुरुवात केली आहे.

जाहिरात
या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, नूतन नगराध्यक्ष स्वतः शहराची स्वच्छता करण्यासाठी नगरपालिकेच्या प्रशासनासोबत सकाळीच कोपरगाव शहरात उपस्थित राहिले. स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले पाऊल नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरणार आहे. परिणामी, शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होत आहे.
युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नूतन नगराध्यक्ष पराग संधान यांनी नगरपालिका निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष जाहीर करण्यात आलेल्या विश्वासार्ह जाहीरनाम्यानुसार कोपरगाव शहर विकासाच्या दिशेने ठोस पाऊल टाकत आहे. पहिल्या शंभर दिवसांत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, त्यासाठी सर्वप्रथम स्वच्छता मोहिमेवर विशेष भर देण्यात येत आहे.
नगरपालिकेच्या प्रशासनाशी समन्वय साधत प्रत्येक प्रभागातील समस्या व अडीअडचणी जाणून घेऊन नागरिकांच्या हितासाठी ठोस आणि प्रभावी निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान, युवा नेते विवेक कोल्हे व नगराध्यक्ष पराग संधान यांनी कोपरगाव नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.तुम्ही शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी समर्थपणे पार पाडा, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास युवा नेते विवेक कोल्हे यांनी कोपरगाव नगरपालिकेच्या समस्त स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिला.
शहरव्यापी स्वच्छता अभियान या मोहिमेअंतर्गत प्रभाग क्रमांक 6 येथे स्वच्छता अभियानास सुरुवात झाली.  याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक विक्रमादित्य सातभाई, आशिष निकुंभ ,यश काले, ओम बागुल,नितीन जोशी, कुणाल कुरे, शुभम भावसार,योगेश अमृतकर, निखिल जोशी, सनी खैरे तसेच इतर युवा कार्यकर्ते, नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. सदर प्रसंगी नवनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान, अतुल काले,आनंद काले यांनी सदिच्छा भेट दिली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे