आपला जिल्हा

राष्ट्रीय निबंध स्पर्धेत सोमैया महाविद्यालयाची कोमल केकाण प्रथम 

राष्ट्रीय निबंध स्पर्धेत सोमैया महाविद्यालयाची कोमल केकाण प्रथम

राष्ट्रीय निबंध स्पर्धेत सोमैया महाविद्यालयाची कोमल केकाण प्रथम 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३० डिसेंबर २०२५सोनूभाऊ बसवंत कला व वाणिज्य महाविद्यालय शहापूर जि. ठाणे येथे झालेल्या राष्ट्रीय निबंध स्पर्धेत स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. कोमल केकाण हीस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे, अशी माहिती प्राचार्य प्रो. डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली. यावेळी संस्थेचे विश्वस्त  संदीपराव रोहमारे व वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे उपस्थित होते.

जाहिरात

याविषयी अधिक माहिती देताना महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाचे प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे म्हणाले की, “उपरोक्त महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत आयोजित राष्ट्रीय निबंध स्पर्धेत कु. कोमल केकाणच्या ‘नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरण :  जागतिक समस्या व आव्हाने’ या विषयावरील मराठी माध्यमातील निबंधाला तीनही माध्यमातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ४ हजार रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र एका दिमाखदार समारंभात ज्ञानवर्धिनी ट्रस्ट विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष किशोर कुडव व  कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष  बाळकृष्ण पाटील यांच्या शुभहस्ते आणि प्राचार्य अनिलकुमार सिंह यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.”

जाहिरात

कुमारी केकाण हिने यापूर्वी देखील अशा अनेक निबंध स्पर्धांमध्ये पारितोषिके प्राप्त केली आहेत. कुमारी केकाण हिला  प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, डॉ. जिभाऊ मोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कुमारी केकानच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, विश्वस्त संदीप राव रोहमारे, सचिव अॅड.संजीव कुलकर्णी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

कुमारी केकान हिचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, वांग्मय मंडळ प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे व इतर प्राध्यापक

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे