देवयानी फेम शिवानी सुर्वे रविवारी संगमनेरात; यशोधन मैदानावर शनिवार व रविवार महिलांसाठी क्लब दांडिया
देवयानी फेम शिवानी सुर्वे रविवारी संगमनेरात; यशोधन मैदानावर शनिवार व रविवार महिलांसाठी क्लब दांडिया

या कार्यक्रमांमध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात,नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, यांच्यासह विविध मान्यवर महिला सहभागी होणार आहेत. शनिवारी नागपूर येथील प्रसिद्ध गरबा नृत्य दिग्दर्शक यश तुमाने हे सहभागी होणार आहे. यावेळी ते संगमनेर मधील पहिल्यांदा गरबा नृत्य दिग्दर्शित करणार आहे. तर रविवारी देवयानी महाराष्ट्रातील मराठी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री शिवानी सुर्वे रात्री सात ते दहा या वेळेत महिलांसोबत दांडिया खेळण्यासाठी उपस्थित राहणार आहे. यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात व सौ.दुर्गाताई तांबे या ही महिलांसोबत दांडिया खेळणार आहेत.

यशोधन मैदानावर दांडिया क्लब साठी जय्यत तयारी करण्यात आली असून पावसाच्या दृष्टीने 100 x 120 फुटाचा डोम मंडप तयार करण्यात आला आहे. याचबरोबर एलईडी स्क्रीन भव्य स्टेज महिलांसाठी दांडिया खेळण्याकरता भव्य मैदान, आकर्षक लाइटिंग व्यवस्था, सेल्फी पॉईंट, रील साठी व्यवस्था अशा अद्यावत सुविधा करण्यात आले आहेत. सर्व महिला व तरुणींना मोफत प्रवेश असणार आहे.

तरी या क्लब दांडियामध्ये शहरातील व तालुक्यातील सर्व महिला व तरुणीने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कुटुंब फाउंडेशन,शिव तांडव प्रतिष्ठान, हिंदू राजा प्रतिष्ठान व एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवानी सुर्वे प्रत्येकी सोबत दांडिया खेळणारमराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री देवयानी शिवानी सुर्वे या पूर्णवेळ दांडियामध्ये सहभागी होणारा असून सर्व सहभागी महिला व युवती समवेत त्या स्वतंत्र दांडिया खेळणार आहेत. याचबरोबर आय लव संगमनेर चळवळीच्या वतीने संगमनेर शहरांमध्ये सुरू असलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याने क्लब दांडियाची जोरदार तयारी यशोधन मैदानावर करण्यात आली आहे.



