ग्राम बाल संरक्षण समित्याचे कामकाज सुरू करावे- डॉ. अशोक गावित्रे
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे मागणी

कोपरगाव विजय कापसे दि ११ फेब्रुवारी २०२५– देशभरात तसेच राज्यात देखील बालकाच्या संदर्भातील लैंगिक अत्याचारात वाढ झालेली असून हा विषय अतिशय गंभीर होत चाललेला आहे बालकाच्या संदर्भातील लैंगिक अत्याचार हिंसा,बालकामगार, बालविवाह यात मोठे प्रमाणात वाढ होताना दिसत आहे ,बालके शाळेत देखील सुरक्षित नाही हे काही घटनेवरून समोर येत आहे शाळेत देखील सखी सावित्री समिती असुन त्याची देखील आढावा बैठक घेतली जात नाही बालकांच्या हक्क व संरक्षण संदर्भात महाराष्ट्र शासनाने एकात्मिक बाल संरक्षण योजना दिनांक १३ ऑगस्ट २०१० रोजी केंद्र शासना बरोबर सामांजस्य करार करून अस्तित्वात आणली महिला व बालविकास विभागाने एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत ग्राम तालुका व नगर बाल संरक्षण समितीच्या स्थापन करण्याबाबत शासन निर्णय १० जून २०१४ रोजी काढण्यात आला परंतु या समित्या काही ठिकाणी अस्तित्वातच नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली असून काही ठिकाणी स्थापन असून त्या कागदोपत्रीच असून त्या अद्ययावत करण्यात आलेले नाही तसेच त्याची कुठलीही मासिक सभा घेतली जात नसून त्या फक्त कागदावरच अस्तित्वात आहे असे माहिती डॉ अशोक गावित्रे यांनी दिली आहे.



महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तसेच जिल्हा परिषदेचे सीईओ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेले आहे. तसेच शहरी भागात देखील या समित्या कशा स्थापन कराव्या याबाबत देखील अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती उपलब्ध नाही असे दिसते संपूर्ण राज्यात हीच स्तिथी असुन ग्राम बाल संरक्षण समिती अद्ययावत करून सदस्यांची कार्यशाळा आयोजित करावी अशी मागणी त्यांनी केली आहे



