आपला जिल्हा

महिला बचत गटांचा महाउत्सव असलेला गोदाकाठ महोत्सव शुक्रवार पासून सुरु- पुष्पाताई काळे

महिला बचत गटांचा महाउत्सव असलेला गोदाकाठ महोत्सव शुक्रवार पासून सुरु- पुष्पाताई काळे

महिला बचत गटांचा महाउत्सव असलेला गोदाकाठ महोत्सव शुक्रवार पासून सुरु- पुष्पाताई काळे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ५ जानेवारी २०२६महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या कौशल्याला आणि उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारा महिला बचत गटांचा महाउत्सव म्हणून ‘गोदाकाठ महोत्सव’ राज्यात ओळखला जातो. हा ‘गोदाकाठ महोत्सव’ माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (दि.०९) पासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे अशी माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.

जाहिरात

महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्नाचे हक्काचे स्त्रोत निर्माण करून देणारा ‘गोदाकाठ महोत्सव’ महिला बचत गटांसाठी मागील अनेक वर्षापासून मोठी आर्थिक पर्वणी ठरला आहे. दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असल्यामुळे बचत गटाच्या महिलांनी याहीवर्षी एक महिना अगोदरच आपले स्टॉल्स बुक केले आहेत. दरवर्षी बचत गटाच्या महिलांबरोबरच नागरीकांना देखील गोदाकाठ महोत्सवाची मोठी आतुरता असते. हि आतुरता आता संपली असून शुक्रवार पासून गोदाकाठ महोत्सव सुरु होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

जाहिरात

महिला बचत गट चळवळीला प्रोत्साहन व पाठबळ देवून बचत गटांच्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर अल्पदरात बचत गटाच्या महिलांना स्टॉल्स उपलब्ध करून दिले जातात. बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होवून या मालाची जास्तीत जास्त विक्री व्हावी या उद्देशातून सुरु करण्यात आलेला गोदाकाठ महोत्सव जिल्ह्यासह राज्यपातळीवर पोहोचला आहे.बचत गटाच्या महिलांची ‘हक्काची बाजारपेठ’ अशी वेगळी ओळख संपूर्ण जिल्ह्यात ‘गोदाकाठ महोत्सवाची’ झालेली आहे. या गोदाकाठ महोत्सवांमध्ये बचत गटाच्या महिलांनी एकत्र येवून  तयार केलेल्या हस्तनिर्मित वस्तूखाद्यपदार्थपारंपारिक उत्पादनं स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी मिळत असल्यामुळे दरवर्षी कोपरगाव तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातील नागरीकही या गोदाकाठ महोत्सवाला आवर्जून उपस्थित असतात.

याहीवर्षी गोदाकाठ महोत्सवाचे उदघाटन शुक्रवार (दि.०९) रोजी दुपारी ४.०० वाजता कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळेगौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या हस्ते व आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या गोदाकाठ महोत्सवात विविध महिला बचत गटांचे आकर्षक स्टॉल्स उभारण्यात येणार असून त्यामध्ये घरगुती खाद्यपदार्थपारंपरिक व आधुनिक पदार्थशेतीपूरक व्यवसायातील उत्पादनेहस्तकला वस्तूसणासुदीच्या वस्तूकपडेदागिनेगृह उद्योगातून तयार केलेली उत्पादने आदींचा समावेश असणार आहे. त्यामुळे नागरिकांना शुक्रवार (दि.०९) पासून सोमवार (दि.१२) पर्यंत चार दिवस गोदाकाठ महोत्सवात एकाच ठिकाणी विविध दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.कोपरगाव तालुकयातील सर्व नागरिकांनी व बचत गटांच्या प्रतिनिधींनी गोदाकाठ महोत्सवास भेट देवून अस्सल ग्रामीण संस्कृतीचा व विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेवून बचत गटाने तयार केलेल्या उच्च दर्जाचा माल स्वस्त दरात खरेदी करण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका  चैतालीताई काळे यांनी केले आहे.

 शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या ‘गोदाकाठ महोत्सव’साठी जय्यत तयारी सुरु आहे. महिला बचत गटांना कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्नाचे हक्काचे स्रोत निर्माण करून देणेत्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणेमहिलांच्या उद्योजकतेला चालना देवून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे हा ‘गोदाकाठ महोत्सव’चा प्रमुख उद्देश आहे. हा उद्देश साध्य करण्यासाठी व महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच महिलांच्या कष्टाला दाद देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.- पुष्पाताई काळे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे