आपला जिल्हा

धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दोन दिवस मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीर

धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दोन दिवस मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीर

धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दोन दिवस मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीर

जाहिरात

संगमनेर विजय कापसे दि ६ जानेवारी २०२६लायन्स क्लब ऑफ संगमनेर, श्री व श्रीमती रामनारायणजी बूब मेमोरियल ट्रस्ट, उमा गौरी वुमन्स ग्लोबल फौडेंशन यांच्या सहकार्याने आयोजित कै. डॉ. शरदकुमार दिक्षीत (अमेरिका) यांचे स्मरणार्थ २६ वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीर रविवार दि. ११ व १२ जानेवारी २०२६ रोजी संपन्न होणार असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ संगमनेरचे अध्यक्ष ला. संजय आसावा यांनी दिली.
या मोफत शिबीराचे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिका येथील प्रसिध्द प्लॅस्टिक सर्जन डॉ. शरदकुमार दिक्षीत यांचे सहयोगी प्रख्यात सर्जन डॉ. लेरी वेनस्टेन व डॉ. व्हिटने व सहकारी अमेरिकेहून खास या शिबीरासाठी येऊन विनामूल्य शस्त्रक्रिया करणार आहे.

जाहिरात

सदर शिबीरात दुभंगलेले ओठ व टाळू, नाक व कान यावरील बाह्यविकृती, चेहऱ्यावरील व्रण व डाग, पापण्यांची विकृती, चिकटलेली बोटे, फुगलेले गाल आदी आजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील रुग्ण नोंदणी व तपासणीसाठी रविवार, दि. ११/०१/२०२६ रोजी सकाळी ८.३० वा. तपासणीसाठी उपाशीपोटीच यावे. प्राथमिक तपासणीनंतरच व्यक्तींची शस्त्रक्रियेसाठी निवड केली जाईल. अशी माहिती क्लबचे सचिव ला.अमोल खटाटे व डॉ.अभय चोरडिया यांनी दिली.

जाहिरात

सदर शिबारामध्ये जळालेल्या, भाजलेल्या व पांढरे डाग असलेल्या रुग्णांना या शिबीरात भाग घेता येणार नाही. शिबीरासाठी नांव नोंदणी एम.जे.एफ. ला. डॉ. सुचित गांधी, ९८२२२६२९६९ ला. चेतन कर्डिले, ९७३००४७०३५, ला. राणीप्रसाद मुंदडा ९३७१०६१००७ यांच्याकडे करावी शिबाराचे स्थळ धन्वंतरी हॉस्पिटल, डॉ. प्रविणकुमार पानसरे (जनरल सर्जन) नविन नगर रोड, ताजणे मळा, संगमनेर या ठिकाणी होणार आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे