आपला जिल्हा

संजीवनी पॉलीटेक्निकची सर्वोत्कृष्ट  निकालाची परंपरा कायम

संजीवनी पॉलीटेक्निकची सर्वोत्कृष्ट  निकालाची परंपरा कायम


                                        कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा शुभम  पवार ९८. ४७ टक्के गुण मिळवनु सर्व प्रथम

जाहिरात

कोपरगांव विजय कापसे दि ८ जानेवारी २०२६– :महाराष्ट्र  राज्य तंत्र शिक्षण  मंडळ, मुंबई ने घेतलेल्या विषम  सत्र हिवाळी परीक्षा २०२५ चे निकाल नुकतेच जाहिर केले असुन यात संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या तृतिय वर्षाचा सरासरी निकाल ९७ टक्के लागला असुन यात तृतिय वर्ष  कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी विभागातील तृतिय वर्षाच्या शुभम  प्रकाश  पवारने पाचव्या सत्रात शेकडा ९८. ४७ टक्के गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडवत सर्व शाखांमधुन प्रथम क्रमांक मिळविला आहे. दरवर्षी  प्रमाणे याही वर्षी विषम सत्रांच्या परीक्षांच्या निकालामध्ये संजीवनी पॉलीटेक्निकने सर्वोत्कृष्ट  निकालाची परंपरा कायम राखली आहे, अशी  माहिती प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

प्राचार्य मिरीकर यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकला चालु शैक्षणिक वर्षापासून  ऑटोनॉमस दर्जा प्राप्त झाल्यामुळे फक्त दुसऱ्या  आणि तिसऱ्या वर्षातील विषम  सत्रांच्या परीक्षा महाराष्ट्र  राज्य तंत्र षिक्षण मंडळाने घेतल्या. यात तृतिय वर्ष  पाचव्या सत्रातील निकाल पुढीलप्रमाणे. कंसात शेकडा गुण व गुणानुक्रमांक. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी-सेजल गणेश  सुपनर (९८. १२, द्वीतिय) व टीना मुकेश  तळेले (९७. ५३ तृतिय). मेकॅट्रॉनिक्स-    वैष्णवी  बाबासाहेब मापारी (९६. ४७, प्रथम), सिध्दी संदीप भाकरे (९५. २९, द्वीतिय) व किरण दामोधर फड (९५. ०६, तृतिय).इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग-मयुर ज्ञानेश्वर  भटाटेे (९४. ४७, प्रथम), नंदीनी सचिन मगर (९३. ६५, द्वातिय) व योगेश  रामदास तुरकणे (९३. ५३, तृतिय). मेकॅनिकल इंजिनिअरींग-अक्सा बद्रूद्दिन शेख (९१. २९, प्रथम), गिरीश  प्रविण तांदळे (८८. ७१, द्वीतिय), शिवम  गोरक्षनाथ देशमुख व कार्तिक केशव वरखडे (८८. ३५ , दोघेही तृतिय).सिव्हिल इंजिनिअरींग-देविदास बापु खलाने (९०, प्रथम), अंजली नारायण जाधव (८९. ६७, द्वीतिय) व श्रावणी सतिश  सोनजे (८६. ११, तृतिय). द्वीतिय वर्ष , तिसरे सत्र. कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी-दिशा  अनिल दोंड (९५. ७७, प्रथम), विभुती बाळासाहेब औताडे (९५. २९, द्वीतिय) व याशिका  प्रवीण शर्मा (९५. १८ , तृतिय).मेकॅट्रॉनिक्स-साई निलेश  परदेशी (८९. ४४, प्रथम), दिव्या भगवान अहिरे (८९. ३३, द्वीतिय) व प्रेम अजय लासनकर (८९. ११ , तृतिय). इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग- अस्मिता सुभाष  चौधरी (८८, प्रथम), अक्षरा रविंद्र पागीरे (८६. ८२, द्वीतिय) व आरती जय अडसरे (८६, तृतिय). मेकॅनिकल इंजिनिअरींग-अथर्व संजय होन (९५. २९, प्रथम), सृष्टी   रंगनाथ गुरसळ (९३. ११, द्वीतिय) व रेहनखान  अर्षदखान पठाण (८९. ७८, तृतिय). सिव्हिल इंजिनिअरींग- शिवानी  संभाजी काळे (८७. ०६, प्रथम), श्रुती  गणेश  जपे (८५. ७६, द्वीतिय) व गौरव विष्णू तांबे (८०. ८२, तृतिय).

जाहिरात

    या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी काही  विषयांमध्ये १०० पैकी ९५ पेक्षा अधिक गुण मिळवुन शिक्षकांनी घेतलेल्या परीश्रमाचे चीज केले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राचार्य, विभाग प्रमुख, डीन्स, शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

शुभम पवार (प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण विद्यार्थी)

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे