आपला जिल्हा

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ९ मार्च २०२६ : श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. अॅड. भगीरथ (काका) शिंदे तसेच आमदार आशुतोष काळे यांनी शुभेच्छा संदेश पाठवून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  रेणुका ताई कोल्हे यांनी भूषविले.

जाहिरात

प्रमुख अतिथी डॉ. मंजुषा गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना महिलांच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती दिली. “जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने २०२६ पासून भारतात १४ वर्षांच्या मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण मोहीम राबवली जात असून या लसीकरणामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते,” असे त्यांनी सांगितले.

जाहिरात

प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी आपल्या मनोगतात स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व अधोरेखित करताना महाविद्यालयीन जीवन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडविण्याचा महत्त्वाचा टप्पा असल्याचे नमूद केले. स्त्री शक्ती ही समाजाची प्रेरणा असून महिलांचा सन्मान ही समाजाची पायाभूत मूल्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात

अध्यक्षीय भाषणात सौ. रेणुका ताई कोल्हे यांनी महिलांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून स्त्री ही कुटुंब व्यवस्थेचा कणा असून ती मनाने व शरीराने सक्षम असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

जाहिरात

कार्यक्रमाचे  प्रास्ताविक डॉ. उज्वला भोर यांनी केले. या कार्यक्रमास डॉ. सुजित सोनवणे, डॉ. कविता चौधरी, वैशाली वाजे,  निलोकर  पठाण,  पल्लवी डडियाल,  मनीषा पगारे,  विजया देवकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा दाभाडे यांनी केले तर आभार प्रा. शोभा दिघे यांनी मानले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे