महात्मा फुले मंडळाच्या कोपरगाव अध्यक्षपदी विरेंन बोरावके
महात्मा फुले मंडळाच्या कोपरगाव अध्यक्षपदी विरेंन बोरावके
महात्मा फुले मंडळाच्या कोपरगाव अध्यक्षपदी विरेंन बोरावके

कोपरगाव विजय कापसे दि १८ जानेवारी २०२६– समाजाच्या न्याय हक्कासाठी नियमित झटत असलेली व सामाजिक कार्यात अग्रेसर आसलेल्या कोपरगाव महात्मा फुले मंडळाची रविवार दि १८ जानेवारी रोजी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत सन २०२६ ते २९ ची कार्यकारीनी जाहीर करण्यात आली असून या कार्यकारीनीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक विरेंन ज्ञानदेव बोरावके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

तसेच कार्याध्यक्षपदी प्रदीप माधवराव नवले, उपाध्यक्षपदी तुषार अरविंद ससाणे, सुमित कैलास जगझाप, खजिनदार पदी रवींद्र रमेश चौधरी, सेक्रेटरी पदी अनुप अनिल गिरमे, सह सेक्रेटरी पदी शैलेश शाम गाडेकर यांच्यासह सदस्य म्हणून किरण तुकाराम बोरावके, विशाल आनंद राऊत, वैभव सूर्यभान गिरमे, राजेंद्र हरिभाऊ बोरावके, सचिन तुकाराम ससाणे, राहुल पुंजाजी राऊत, अक्षय नरेंद्र गिरमे, महेंद्र अरविंद बोरावके यांची निवड करण्यात आली आहे.





