आपला जिल्हा

सोमैया महाविद्यालयात सायबर सुरक्षितता आणि प्रतिबंध विषयावर  व्याख्यान  

सोमैया महाविद्यालयात सायबर सुरक्षितता आणि प्रतिबंध विषयावर  व्याख्यान 

सोमैया महाविद्यालयात सायबर सुरक्षितता आणि प्रतिबंध विषयावर  व्याख्यान  

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २२ जानेवारी २०२६फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम,  ऑनलाइन फ्रॉड ,फेक प्रोफाइल ,सायबर स्टॅकिंग यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा योग्य वापर कसा करावा, तसेच वेळेचे नियोजन, गोपनीयता आणि सायबर सुरक्षिततेचे महत्त्व  याविषयीचे अभ्यासपूर्ण विवेचन प्रा. हर्षदा गवळी यांनी केले, अशी माहिती प्राचार्य डॉ विजय ठाणगे यांनी दिली.

जाहिरात

सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत महिला तक्रार निवारण कक्षाच्या वतीने  ‘सायबर सुरक्षा आणि प्रतिबंध’ या विषयावर आयोजित व्याख्यानसत्रात त्या बोलत होत्या.  अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य  डॉ. विजय ठाणगे म्हणाले की, “सोशल मीडियाचा वापर माहिती, शिक्षण, व्यवसाय आणि सामाजिक संपर्कासाठी उपयुक्त असला तरी त्याचा अतिरेक मानसिक आरोग्यावर घातक परिणाम करू शकतो. समाजामध्ये अनिष्ट  प्रवृत्तीच्या व्यक्ती ए .आय .टेक्नॉलॉजीचा गैरवापर करतात. त्यामुळे सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात घडून येतात. विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव करणे आवश्यक आहे. विशेषतः युवकांनी सोशल मीडियाचा जबाबदारीने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून वापर करावा”,असेही ते म्हणाले.

जाहिरात

 अंतर्गत तक्रार महिला  कक्षाच्या प्रमुख डॉ.सुरेखा भिंगारदिवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. नीता शिंदे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. अदिती देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. वर्षा आहेर, प्रा. विभूते मॅडम, प्रा. आहेर मॅडम, प्रा.बागुल  यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे