आपला जिल्हा

आंतरराष्ट्रीय लोककला स्पर्धेसाठी अमृतवाहिनीच्या त्रिशा कदमची निवड

आंतरराष्ट्रीय लोककला स्पर्धेसाठी अमृतवाहिनीच्या त्रिशा कदमची निवड

आंतरराष्ट्रीय लोककला स्पर्धेसाठी अमृतवाहिनीच्या त्रिशा कदमची निवड

जाहिरात

Sangmner vijay kapse दि २७ मे २०२६पुणे येथे अखिल लोककला सांस्कृतिक संस्थेने आयोजित केलेल्या भारत महोत्सव २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता तिसरी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी त्रिशा सचिन कदम हिने लोकनृत्य स्पर्धा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून संगमनेरचे नाव उज्ज्वल केले. त्रिशाच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल व्हिएतनाममध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कला महोत्सवामध्ये लोकनृत्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ही संगमनेरच्या कला क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे.

जाहिरात

संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी मध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असते. त्रिशाने बालरंगभूमी परिषद, मुंबई- जल्लोष लोककलेचा नृत्यस्पर्धेत प्रथम क्रमांक, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, संगमनेर शाखेच्यावतीने आयोजित लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक, टीम ड्रीम लांचर नाशिकच्या राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

जाहिरात

लोकनृत्य स्पर्धैबरोबरच त्रिशाने वेगवेगळ्या कला प्रकारात आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. ती सध्या अमृतवाहिनी इंटरनेशनल स्कूलमध्ये इयत्ता तीसरी वर्गात शिकत आहे. तिच्या या यशाबद्दल माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, शरयू  देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य जे.बी सेठी, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जोंधळे, वडील प्रा. सचिन कदम, यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे